बांबूवर कारागिर जॉर्डन लेप
सिक्कीममधील ५० वर्षीय शेतकरी जॉर्डन लेपचा यांचीही पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बांबूवर अप्रतिम कामामुळे त्यांना गौरविण्यात येणार आहे. ते सिक्कीमच्या मंगन शहराचे रहिवासी असून २५ वर्षांहून अधिक काळ ते पारंपारिक विणकाम आणि हस्तकला जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर त्यांनी १५० हून अधिक तरुणांना ही कला शिकवली आहे.
देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान करणारी घोषणा केली. यावेळी सरकारकडून पद्मश्री पुरस्कारासाठी नावांची घोषणा करताना यात ५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात ६७ वर्षीय 'नारियाल अम्मा' उर्फ कामाची चेल्लमल, सर्वेश्वर बासुमातारी, सत्यनारायण बेलेरी, यानुंग जामोह लेगो, संजय अनंत पाटील यांचा समावेश आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नावांमध्ये ६७ वर्षीय 'नारियाल अम्मा' उर्फ कामाची चेलाम्मल यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. तर कामाची चेल्लमल या दक्षिण अंदमानमधील रंगाचांग येथील रहिवासी असून त्यांना सेंद्रिय पद्धतीने नारळाची लागवड केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. कामाची चेल्लमल यांनी नाराळाबरोबरच लवंग, आले, अननस आणि केळीची देखील यशस्वी लागवड केली आहे.
औषधी वनस्पतींची राणी लेगोलांसह यांचाही सन्मान
अरुणाचल प्रदेशच्या यानुंग जामोह लेगोला यांना पूर्व सियांगमध्ये औषधी वनस्पतींची राणी असे म्हणतात. त्या ५८ वर्षीय असून सरकारी आकडेवारीनुसार, १० हजारहून अधिक रुग्णांवर नैसर्गिक पद्धतींनी उपचार केले आहेत. तसेच एक लाख लोकांना औषधी वनस्पतींबाबत प्रबोधन केले आहे. त्यामुळे लेगोला यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे. तर लेगोला यांच्याबरोबरच आसामचे सर्वेश्वर बासुमातारी, केरळचे सत्यनारायण बेलेरी, गोव्याचे संजय अनंत पाटील यांचीही पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
विशेषत: त्या जास्त शिकलेल्या नाहीत. त्यांचे शिक्षण हे सहावीपर्यंतच झाले आहे. तरिही त्यांनी आपल्या शेतीची पद्धत १५० हून अधिक शेतकऱ्यांना शिकवली आहे. ज्यात नारळ आणि पाम वृक्षांसाठी नाविन्यपूर्ण, किफायतशीर नुकसान नियंत्रण उपाय पद्धतीचा समावेश आहे. तर कामाची चेल्लमल या दोन हेक्टर बागेतून दरवर्षी २७,००० हून अधिक नारळ काढतात. तसेच त्यांच्या बागेत उंच जातीची ४६० खजुरीची झाडेही आहेत.
एकात्मिक मिश्र शेती करणारे बसुमातारी
या पुरस्कार यादीच जसे ६७ वर्षीय 'नारियाल अम्मा' उर्फ कामाची चेल्लमल यांच्या नावाची चर्चा होत आहे. तशीच चर्चा ६१ वर्षीय सर्वेश्वर बासुमातारी यांची देखील होत आहे. त्यांनी एकात्मिक मिश्र शेती पद्धतीचा यशस्वीपणे अवलंब केला. त्यांनी नारळ, संत्रा, भात, लिची, मका अशा विविध प्रकारची पिके घेतली आहेत.
भाताच्या वाणांचे जतन करणाऱ्या
तर, केरळमधील कासरगोड येथील भात शेतकरी सत्यनारायण बेलेरी यांनी ६५० हून अधिक पारंपारिक भाताच्या वाणांचे जतन केले आहे. त्यांच्या 'राजकायम' भात जातीची कर्नाटक आणि तामिळनाडूचे शेतकरी निवड करतात. तर सत्यनारायण बेलेरी यांनी १५ वर्षांच्या अथक परिश्रमातून देशी तांदळाच्या जाती, सुपारी, जायफळ आणि काळी मिरी यांसारख्या पारंपारिक बियांचे जतन करणारी सीड बँक तयार केली आहे.
बांबूवर कारागिर जॉर्डन लेप
सिक्कीममधील ५० वर्षीय शेतकरी जॉर्डन लेपचा यांचीही पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बांबूवर अप्रतिम कामामुळे त्यांना गौरविण्यात येणार आहे. ते सिक्कीमच्या मंगन शहराचे रहिवासी असून २५ वर्षांहून अधिक काळ ते पारंपारिक विणकाम आणि हस्तकला जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर त्यांनी १५० हून अधिक तरुणांना ही कला शिकवली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.