Money Lenders  Agrowon
ॲग्रो विशेष

Money Lending : सावकारीच्या विळख्यात अडकले ६३ हजार शेतकरी

Illegal Money Lenders : बॅंकांचे कर्ज भरण्यास अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांवर सावकारी कर्ज घेण्याची वेळ येत आहे.

Team Agrowon

Amravati News : बॅंकांचे कर्ज भरण्यास अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांवर सावकारी कर्ज घेण्याची वेळ येत आहे. जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत परवानाधारक ६०२ सावकारांनी ६३,०६३ कर्जदारांना ६७.४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. खासगी सावकारांकडील कर्जाचा आकडा त्यापेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे.

अनियमित पाऊसमान व इतर कारणांमुळे पिकांची उत्पादकता घटली आहे. परिणामी उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याची स्थिती आहे. त्याच कारणामुळे कौटुंबिक गरजांसह मुलांचे शिक्षण, आरोग्य यावर होणाऱ्या खर्चासाठी पैशाची सोय करणे आव्हानात्मक ठरत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते.

बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडही त्यांना शक्‍य होत नाही. परिणामी दुसऱ्या हंगामात त्यांना पेरणीसाठी पैशाची सोय करणे आव्हानात्मक ठरते. अशा वेळी शेतकरी सावकारांचे उंबरठे झिजवितात. परवानाधारक सावकारांकडून ‘बिगर कृषी कर्ज’ असा शब्दप्रयोग करून शेतकऱ्यांना वित्तपुरवठा होतो.

दागिने, प्लॉट, घर, शेती तारण ठेवून हे कर्ज घेतले जाते. त्यातच गेल्या काही वर्षांत अवैध सावकारी देखील जोरात सुरू आहे. त्यासाठी तीन, पाच टक्‍के महिना दराने व त्यावर देखील चक्रवाढ व्याजाची आकारणी करून पैसे उकळले जातात. त्यामुळे जिल्हाभरात शेतकरी सावकारी विळख्यात अडकले आहेत.

सहकार विभागाकडे या संदर्भात तक्रार केल्यास अशा सावकारांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र शेतकरी कर्जापायी पिचलेला असल्याने त्यांच्याकडून अशी हिंमत होत नाही. परिणामी खासगी सावकारांचे फावते व त्यांच्याकडून दामदुप्पट दराने वसुली होते.

(ॲग्रो विशेष)

डिसेंबर २०२३ अखेर पर्यंतची स्थिती (कोटी रुपयांत)

अमरावती ः १२.७२

भातकुली ः ६१ लाख

मोर्शी ः ५.५३

अंजनगावसूर्जी ः ५.५४

धामणगावरेल्वे ः ८८६

वरुड ः ३३ लाख

अचलपूर ः ११.०७

धारणी ः ४४.५१ लाख

नांदगाव खंडेश्‍वर ः १२.८२ लाख

चांदूररेल्वे ः ५.५३

चांदूर बाजार ३ १०.८१

तिवसा ः २.४५

दर्यापूर ः ३.४३

एकूण ः ६७ कोटी ४३ लाख ५३ हजार

तालुकानिहाय परवानाधारक सावकार

अमरावती ः २३०, अचलपूर ः १३५, भातकुली ८, मोर्शी ३३, अंजनगावसूर्जी २३, धामणगावरेल्वे २७, वरुड ३४, धारणी १७, नांदगाव खंडेश्‍वर १४, चांदूररेल्वे ९, चांदूरबाजार ४०, तिवसा १९, दर्यापूर १३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT