Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी धरणात वाढला ६.२५ टीएमसी पाणीसाठा

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने उणे पातळी तब्बल ६० टक्क्यांपर्यंत गाठली होती. परंतु गेल्या आठवड्यात धरणासह धरणाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे दहा दिवसांतच जवळपास ६.२५ टीएमसी पाणी वाढले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी (ता. १७) धरणात उणे ४८.३१ टक्के इतका पाणीसाठा होता.

मागच्यावर्षी कमी पाऊसमानामुळे जिल्ह्यातील उजनी धरणासह लघू आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाकडे चालला होता. त्यात उजनी धरण तर उणे पातळीत पोचले होते. तर लघू आणि मध्यम प्रकल्पातील साठा दीड टक्क्यांपर्यंत राहिला.

सध्या लघू आणि मध्यम प्रकल्पातील वाढ म्हणावी अशी झालेली नाही, पण गेल्या आठवड्यात हंगामाच्या अगदी तोंडावर मृग नक्षत्रावर वेळेवर पाऊस झाला आणि तोही सलग तीन-चार दिवस सुरूच राहिला. त्यात उजनी धरणाच्या परिसरासह कार्यक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने धरणाची उणेच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली. तसेच सुमारे ६.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा या आठवड्याच्या कालावधीत वाढला.

७ जूनला धरणामध्ये एकूण पाणी पातळी ४८४.९४५ मीटरपर्यंत होती, तर एकूण पाणीसाठा ३१.५२ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा उणे ३२.१४ एवढा होता. तर पाण्याची टक्केवारी उणे ५९.९९ टक्के होती.

पण सोमवारी (ता.१७) दहा दिवसांतच पाणीसाठ्यात चांगला फरक पडला. धरणातील एकूण पाणीपातळी ४८६.४५० मीटरपर्यंत पोचली. तर धरणातील एकूण पाणीसाठा ३७.७७ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा उणे २५.८८ टीएमसी तर पाण्याची टक्केवारी उणे ४८.३१ टक्के राहिली. या दहा दिवसांत जवळपास ६.२५ टीएमसी पाणी वाढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Update : भारताकडून एक लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द

M Association Election : ‘एम’ असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये धुरगुडे पॅनेल विजयी

Rain Forecast : राज्यात पावसाची उघडीप शक्य

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

SCROLL FOR NEXT