POCRA  Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA Scheme : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘पोकरा’त ६ हजार कोटींची तरतूद

Devendra Fadnavis : राज्यशासन कायम जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेच्या दुसऱ्या टप्‍यात सहा हजार कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Team Agrowon

Akola News : राज्यशासन कायम जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेच्या दुसऱ्या टप्‍यात सहा हजार कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित आरोग्य महाशिबिर उद्‌घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आरोग्य शिबिरात ३० हजार लाभार्थ्यांची तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. यासाठी दोन दिवस हे शिबिर चालणार आहे. फडणवीस म्हणाले, ‘‘कोरोना काळातील अनुभवानंतर देशातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी काम सुरू झाले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्‍या जात आहेत. मागील अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजसाठी तरतूद केली. राज्यात १४ जिल्ह्यांत अशी महाविद्यालये मंजूर केली आहेत. यापुढे प्रत्येकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल अशी सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे.

येथे शिबिरात तपासणी झालेल्यांना पुढील उपचार गरज पडली तर खासगी दवाखान्यांमध्येही सेवा दिली जाईल. अकोल्यात नव्याने १०० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. नवे पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी सुरू केले जाईल. यासाठी ५० कोटींची तरतूद केली आहे.

अकोल्यासाठी जिगाव प्रकल्पातून ३२ दलघमी पाणी आरक्षित करीत आहोत.नांदेडची घटना दुर्दैवी आहे. खासगी रुग्णालयात मृत्युशय्येवर असलेल्यांना डिस्चार्ज दिले जाते. हे रुग्ण शेवटच्या टप्प्‍यात शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होतात. त्यामुळे मृत्यू दर वाढतो. तरीही नांदेडच्या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, यावरून आरोप करणे चुकीचे आहे.’’

शहीद स्मारकाचे उद्‌घाटन

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून येथे २४ शहिदांचे स्मारक उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहिदांचे पुतळे या ठिकाणी बसवण्यात आले असून, अशा प्रकारचे स्मारक हे अद्वितीय आहे. नेहरू पार्क जवळील या शहीद स्मारकाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हस्ते शनिवारी (ता.७) करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT