Slit Remove Agrowon
ॲग्रो विशेष

Slit Remove : मांगी तलावातून दररोज ६ हजार ब्रास गाळउपसा

Team Agrowon

Karmala News : करमाळा तालुक्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. तलावातील पाणी आटले म्हणून हताश न होता, तलावातील गाळ उचलून शेतात टाकण्यास सुरवात केली आहे. एकाचवेळी तलावात ट्रॅक्टर व हायवा मिळून ५०० ते ६०० वाहने भरत आहेत.

मांगी तलावातून दररोज साधारणपणे ६ हजार ब्रास गाळ उचलला जात आहे. साधारणपणे पाच लाख ब्रासपेक्षा जास्त गाळ मांगी तलावातून उचलला जाईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे. गाळ उचलण्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज २० लाखांपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होत आहे.

करमाळा तालुक्यातील मांगी हा सर्वात मोठा तलाव असून, या तलावातून दररोज सहा हजार ब्रास गाळ उचलला जात आहे. या गाळ उचलण्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून साधारणपणे २० लाख रुपयांची उलाढाल दररोज होत आहे. तीव्र दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील सर्व तलाव पूर्णपणे आटलेले आहेत.

एकीकडे दुष्काळामुळे पाणी आटलेले असताना या दुष्काळाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून शेतकऱ्यांनी या तलावातील गाळाने आपले शेती भरण्यावर भर दिला आहे. मार्च महिन्यापासून मांगी तलावातून मोठ्या प्रमाणावर ती गाळ उचलला जात आहे. मांगी तलाव हा एक टीएमसी पाणी क्षमतेचा आहे.

मात्र गाळाने भरल्याने पाणी कमी प्रमाणात साठत होते. त्यामुळे दरवर्षी या तलावातील पाणी साठवण क्षमता कमी होत गेली आहे. यावर्षी तर हा तलाव पूर्णपणे आटला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणचा गाळ काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पातळी वाढणार आहे. मांगी तलावातून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती गाळ वाहून नेला जात आहे.

कामोणे, जातेगाव, आळजापूर, पोथरे, वडगाव दक्षिण, वडगाव उत्तर, मोरवड, वंजारवाडी, वरकटणे, देवळाली तसेच कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव, शेगुड या भागात देखील मोठ्या प्रमाणावर गाळ वाहतूक केली जात आहे.

अनेक वर्षापासून मांगी तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला होता. दुष्काळी परिस्थिती असल्याने तालुक्याच्या अनेक गावातील शेतकरी येऊन गाळ घेऊन जात आहेत. हा गाळ शेतात टाकल्याने शेतीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शासनाने यासाठी मदत केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.
सुजित बागल, मांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर
मांगी तलावातून शेतकरी स्वखर्चाने गाळ उचलत आहेत. त्याचा फायदा सर्वानाच होणार आहे. गाळाबरोबर वाळू व वाळूमिश्रित माती उचलली जाणार नाही याची काळजी महसूल विभाग घेत आहे.अर्जुननगर, जिंती येथेही गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गाळामुळे शेतीची सुपीकता वाढणार आहे.
शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT