Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : पुणे जिल्ह्यातील धरणांत ६० टीएमसी पाणीसाठा

Dam Water Storage : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. परंतु मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. परंतु मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. नीरा आणि कुकडी धरण क्षेत्रात अधूनमधून तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यात नव्याने सुमारे ६०.५९ टीएमसी पाणीसाठा धरणांत दाखल झाला आहे.

मॉन्सून जवळपास सात जूनच्या दरम्यान दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडत आहे. काही वेळा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या धरणात चोवीस तासांत ०.०३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

या धरणांत एक जूनपासून ते आत्तापर्यंत एकूण १.०८ टीएमसी उपयुक्त पाणी दाखल झाले आहे. तर वरसगाव धरणक्षेत्रात २२ मिमी, तर पानशेतमध्ये २१ मिमी पाऊस पडला. खडकवासला धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. मुठा खोऱ्यातील धरणांत एक जूनपासून ते आतापर्यंत ११.७३ टीएमसी पाणी आले आहे.

नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात कमी-अधिक पाऊस आहे. गुंजवणी धरणक्षेत्रात ४९ मिलिमीटर, तर नीरा देवघर ३४, भाटघर १६, पवना १४, कासारसाई, कळमोडी ११, तर वडिवळे येथे १६ मिलिमीटर पाऊस झाला. चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, वीर या धरणक्षेत्रांत पावसाचा शिडकावा झाला आहे.

त्यामुळे या धरणक्षेत्रातील धरणांत नव्याने फारसा पाणीसाठा आलेला नाही. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणक्षेत्रांत तुरळक सरी पडल्या. विसापूर, उजनी धरणक्षेत्रांत पावसाची उघडीप असून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT