Dam Water Stock : धरणांत चोवीस तासांत ५.७९ टीएमसी पाण्याचा येवा

Pune Rain Update : चालू वर्षी अनेक धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा होती. मागील तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : जिल्ह्यांत आणि घाटमाथ्यांवर पावसाचा जोर वाढला असून, मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील एकूण धरणांत ५.७९ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा ४१.७० टीएमसीपर्यंत पोहचला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये शिरोटा या घाटमाथ्यावर सर्वाधिक २१६ मिलिमीटर पाऊस झाला. तर लोणावळा घाटमाथ्यावर १७७ मिलिमीटर, मुळशी १३६, वळवण १३०, ठोकरवाडी ११०, कुंडली येथे ९७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुळशी धरणांत १.८३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. सोमवारी (ता.१५) दिवसभर घाटमाथ्यांवर पाऊस सुरू होता.

Khadakwasla Dam
Rain Update : कोकणात कोसळधारा, नद्यांना रौद्ररुप; रेल्वे सेवाही ठप्प, राज्यालाही झोडपले

चालू वर्षी अनेक धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा होती. मागील तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात ६३ मिलिमीटर पाऊस पडला, तर वरसगाव ३४, पानशेत ३४, खडकवासला १५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या धरणांत १.४१ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा १०.८० टीएमसी म्हणजेच ३७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नीरा खोऱ्यातील वडिवळे धरणक्षेत्रात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पाऊस पडला, तर पवना धरणक्षेत्रात ८१ मिलिमीटर, आंध्रा ४९, कासारसाई ४०, भामा आसखेड २१,गुंजवणी ३२, नीरा देवघर येथे ३८ मिलिमीटर पाऊस पडला.

वीर, भाटघर, नाझरे, चासकमान या धरणक्षेत्रांत हलका पाऊस झाला. त्यामुळे या धरणांत नव्याने १.८६ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे. आत्तापर्यंत या धरणांत १६.१६ टीएमसी म्हणजेच ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Khadakwasla Dam
Pune Rain Update : लोणावळा, कार्ल्यात सर्वाधिक २०९ मिलिमीटर पावसाची नोंद

कुकडी खोऱ्यातील वडज धरणक्षेत्रात २४ मिलिमीटर पाऊस पडला, तर घोड धरणक्षेत्रात २१ मिलिमीटर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणक्षेत्रांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

त्यामुळे या धरणांत अवघा ०.७९ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा दाखल झाला असून, एकूण पाणीसाठा ५.०१ टीएमसी एवढा जमा झाला आहे. विसापूर, उजनी धरणक्षेत्रांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या आहेत. त्यामुळे पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही.

एक जून ते १५ जुलै या दरम्यान धरणांत आलेला उपयुक्त साठा (टीएमसीमध्ये)

टेमघर ०.९७, वरसगाव ३.१३, पानशेत ३.४७, खडकवासला ३.०३, पवना १.७७, कासारसाई ०.०९, कळमोडी ०.८८, चासकमान १.१२, भामा आसखेड ०.८४, आंध्रा ०.६०, वडिवळे ०.४४, गुंजवणी १.२७, भाटघर ६.८७, नीरा देवघर २.११, वीर ३.५५, पिंपळगाव जोगे १.०५, माणिकडोह ०.८७, येडगाव १.३७, वडज ०.२३, डिंभे २.४९, चिल्हेवाडी ०.१९, घोड ०.३१, विसापूर ०.२०, उजनी १३.१८, मुळशी ५.०९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com