Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Use : नगर जिल्ह्यात रासायनिक खतेवापरात ६० टक्के घट

Chemical Fertilizer : राज्यातील काही जिल्ह्यांत रासायनिक खतांचा वापर वाढल्याचा अहवाल आहे. नगर जिल्ह्यात मात्र गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा सुमारे ६० टक्के रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राज्यातील काही जिल्ह्यांत रासायनिक खतांचा वापर वाढल्याचा अहवाल आहे. नगर जिल्ह्यात मात्र गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा सुमारे ६० टक्के रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे. २०२०-२१ मध्ये खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात मिळून ४ लाख ३३ हजार ९३१ टन खतांचा वापर झाला. त्या तुलनेत यंदा (२०२३-२४) आतापर्यंत (जानेवारी २०२४ अखेर) १ लाख २ हजार ९३० टन वापर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून ही माहिती देण्यात आली.

नगर जिल्ह्यात खरिपात सहा लाख हेक्टर तर रब्बीत ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. उन्हाळी पिकेही बऱ्यापैकी घेतली जातात. खरिपात सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांसह मूग, उडीद, तूर, भात, ही पिके तर रब्बीत ज्वारी, हरभरा, मका, गहू ही प्रमुख पिके घेतली जातात. खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामांत कांद्याचे पीक घेतले जातात.

गेल्या वर्षीचा रासायनिक खतांचा विचार केला तर वर्षभरात जवळपास पावणे सहा लाख टनांची मागणी केली होती. त्यातून पाच लाख टन खतांच्या मागणीला मंजुरी मिळाली. पावणेचार लाख टन खते उपलब्ध झाली, मात्र त्यातून प्रत्यक्ष २ लाख ८९ हजार टन खतांचा शेतकऱ्यांनी वापर केला.

‘‘कापूस, मका, कांद्यासह अन्य पिकांसाठी सर्वाधिक युरियाची मागणी असते. मात्र गेल्या चार वर्षांत युरियाचा वापरही बऱ्यापैकी कमी झाला आहे. २०२०-२१ ला वर्षभरात १ लाख ३६ हजार ६५७ टन युरियाचा वापर झाला. यंदा आतापर्यंत ५१ हजार ३१० टन युरियाचा वापर झाला आहे.

अजून त्याचा साधारणपणे दहा टन वापर होईल, असा अंदाज आहे. तरीही चार वर्षांत ४० टक्के वापर कमी झाला आहे. रासायनिक खतांचा वापर कमी होऊन जैविक, सेंद्रिय खतांचा वापर वाढत आहे,’’ असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी सांगितले.

वर्षनिहाय रासायनिक खतांचा वापर (टनांत)

२०२०-२१ ः ४,३३,९३१

२०२१-२२ ः ३,६५,३३९

२०२२-२३ ः २,८८,९३२

२०२३-२४ ः १,०२,९३० (जानेवारी अखेर)

अनेक शेतकरी सेंद्रिय, जैविक खतांचा वापर करत असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे. केंद्र सरकारकडून विविध सरकारी योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी सुरू असलेल्या रथातूनही सेंद्रिय खतांबाबत माहिती दिली जात आहे.
- अमृत गांगर्डे, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग, नगर
शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीरच आहे. मी दहा वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर बंद केला आहे. सेंद्रिय, जैविक खतांच्या वापरातून दर्जेदार चांगले पीक येते, उत्पादनातही वाढ होते. शिवाय मातीची गुणवत्ता, सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
- संजय वाकचौरे, सेंद्रिय खताचा वापर करणारे शेतकरी, डोंगरगाव, ता. अकोले, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT