Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking Wages : कापूस वेचणीची मजुरी सहा रुपये प्रतिकिलो

Lack of Labor For Picking Cotton : यंदा वेचणीची मजुरी सहा रुपये प्रतिकिलो, अशी आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : पांढरे सोने, अर्थात कापूस पिकातील वेचणीचे काम या आठवड्यात खानदेशात बऱ्यापैकी सुरू झाले आहे. यंदा वेचणीची मजुरी सहा रुपये प्रतिकिलो, अशी आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पिकात सध्या वेचणी सुरू आहे. मागील काही दिवस निरभ्र, कोरडे वातावरण आहे. पूर्वहंगामी किंवा मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कापूस पिकातील पक्व कैऱ्या उमलण्याची क्रिया गतीने सुरू आहे.

खानदेशात सुमारे दीड लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. जळगाव जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी पीक आहे. या क्षेत्रात एकाच वेळी बोंडे वेचणीवर आली आहेत. पुढे सणासुदीचे दिवस आहेत. यामुळे सर्व शेतकरी वेचणीच्या लगबगीत आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही मजूरटंचाई तयार झाली आहे.

यामुळे शेतकरी इतर गावांमधून वेचणीसाठी मजूर आणत आहेत. सातपुडा पर्वतालगतच्या भागात सातपुड्यातील मजूर कामासाठी येत आहेत. मालवाहू, प्रवासी वाहनातून सकाळीच मजूर जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार भागांत पोहोचतात. यासाठीचा वाहतूक खर्च शेतमालकास द्यावा लागतो.

पिकात बोंडे उमलण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. बोंडेही दर्जेदार, शुभ्र व मऊ आहेत. वेचणी व्यवस्थित होत आहे. यामुळे सध्या प्रतिकिलो या दरानुसार वेचणी सुरू आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू होता.

यामुळे प्रतिरोज यानुसार कापूस वेचणी करून घ्यावी लागत होती. यंदा मात्र प्रतिकिलो या मानकानुसार अनेक शेतकरी वेचणीवर भर देत असून, प्रतिकिलो सहा रुपये एवढी मजुरी सध्या गावोगावी दिली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोंडे कमी उमलेले आहेत, ते शेतकरी प्रतिरोज यानुसार मजुरी देत आहे. यात सकाळी नऊ ते चार या कालावधीत कामासंबंधी २०० रुपये प्रतिरोज आणि सकाळी आठ ते दीड या कालावधीत कामासंबंधी १५० रुपये रोज दिला जात आहे.

प्रतिकिलो यानुसार काम करताना जेवढी अधिकची कापूस वेचणी मजूर करील, तेवढी अधिक मजुरी मिळते. प्रतिरोज यानुसार काम करताना मात्र मजुरी दर निश्‍चित असतो.

आमच्या भागात मजूरटंचाई असल्याने इतर गावांमधून वाहतूक खर्च करून मजुरांची ने-आण करावी लागत आहे. सध्या सहा रुपये प्रतिकिलो असा कापूस वेचणीचा मजुरीचा दर आहे. परिसरातील मजुरांची उपलब्धता, निकड व इतर बाबी यानुसार मजुरी दर वेगळे आहेत.
- प्रेमलाल पाटील, शेतकरी, वडनगरी (ता. जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT