Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खानदेशात सहा टक्के क्षेत्र नापेर

Rabi Preparation : नापेर क्षेत्र यंदाही अनेक भागांत आहे. तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात नापेर क्षेत्र आहे. या क्षेत्रात उन्हाळ्यात पूर्वमशागत करण्यात आली.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा सुमारे सहा टक्के क्षेत्र नापेर आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नापेर ठेवले असून, त्यात पुढे केळीसह रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. खानदेशात काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा कमी होतो. पीक फेरपालट करणे अनेकदा शक्य नसते.

तसेच शेणखत व अन्य सेंद्रिय बाबींचा उपयोग होत नसल्याने जमीन सुपीकता टिकविण्यासंबंधी अडचणी येतात. या स्थितीत अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. नापेर क्षेत्र यंदाही अनेक भागांत आहे. तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात नापेर क्षेत्र आहे.

या क्षेत्रात उन्हाळ्यात पूर्वमशागत करण्यात आली. अनेकांनी केळीसाठी खोल नांगरणी केली व शेत भुसभुशीत करून त्यात पेरणी टाळली आहे. जळगाव तालुक्यासह अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागातही अनेकांनी क्षेत्र भुसभुशीत करून घेतले.

रब्बीसाठी तयारी

नापेर क्षेत्रात कोरडवाहू रब्बी पिके जोमात येतात. कमी खर्च लागतो, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे यंदाही नापेर क्षेत्राचा प्रघात अनेक शेतकऱ्यांनी कायम ठेवला आहे. खानदेशात १४ लाख हेक्टरवर खरिपातील पिके असतात. यंदा पेरणीची टक्केवारी चांगली आहे. मागील हंगामात जूनमध्ये पाऊस कमी होता.

जुलैत पाऊसमान बरे होते. पावसाची तूट मात्र दोन्ही महिन्यांत मागील वेळेस होती. यंदा मात्र चांगला पाऊस नाही. सरासरीपेक्षा कमी पाऊस अनेक भागांत जून व जुलैत झाला आहे. आतापर्यंत चांगले पाऊसमान नाही. अशीच स्थिती राहिल्यास रब्बीसही अडचणी येतील.

जुलैत तुरळक, मध्यम पाऊस होता. त्यात पेरणीही ९४ टक्क्यांवर गेली आहे. बाजरी व अन्य पिकांची पेरणीही झाली. कापूस, उडीद, तूर, सोयाबीन, तीळ व अन्य खरीप पिकांची पेरणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.

नापेर क्षेत्रात पूर्वमशागत करणार

नापेर क्षेत्रात सप्टेंबरमध्ये पूर्वमशागत करून ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच केळी, रब्बी पिकांची पेरणी होईल. या क्षेत्रातील पिके जोमात वाढतात व वेळेत पेरणी होत असल्याने पुढे वेळेत काढणी, मळणी होते. सुरुवातीच्या दरांचा लाभही मिळविता येतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पण पुढे त्यासाठी चांगला पाऊसही हवा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US India Trade Tension: अमेरिकेचा दबाव भारत झुगारणार का?

Wild Vegetables: पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बहरल्या रानभाज्या

Urea Data Mismatch: पावणेतीन लाख टन युरियाचा हिशेब लागेना

Monsoon Heavy Rain: मुसळधार पाऊस, पूरस्थितीचा फटका

Maharashra Monsoon Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT