Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paiswari : हिंगोली जिल्ह्याची खरिपाची हंगामी पैसेवारी सरासरी ५९.६२

Kharif Season : हिंगोली जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ७०७ गावांतील लागवडीयोग्य क्षेत्र ४ लाख १० हजार ७१७ हेक्टर आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Hingoli News : जिल्ह्यातील या वर्षीच्या (२०२३) खरीप पिकांची हंगामी (नजर) पैसेवारी शनिवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केली आहे.जिल्ह्याची हंगामी (नजर) पैसेवारी सरासरी ५९.६२ आली आहे अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ७०७ गावांतील लागवडीयोग्य क्षेत्र ४ लाख १० हजार ७१७ हेक्टर आहे. या गावांतील यंदाचे (२०२३) पेरणीक्षेत्र ३ लाख ८१ हजार ६०९ हेक्टरवर आहे. तर एकूण पडीक क्षेत्र २८ हजार १४२ हेक्टर आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली जिल्ह्यातील ५ तालुक्यांची खरीप पिकांची हंगामी (नजर) पैसेवारी ५२.६४ ते ६९ पैसे, तर जिल्ह्याची हंगामी पैसेवारी सरासरी ५९.६२ एवढी आली आहे.

म्हणजेच ५० पेक्षा जास्त आली आहे. जिल्ह्यात यंदा जुलै ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांना पाण्याचा ताण बसला. जुलैमध्ये अनेक मंडलांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे.

जिल्हा प्रशासनाकडून ता. ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित हंगामी पैसेवारी, तर ता. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्हा खरीप २०२३ हंगामी (नजर) पैसैवारी स्थिती

तालुका गावांची संख्या पेरणी क्षेत्र पैसेवारी (पैसे)

हिंगोली १५२ ८०४९२ ५५.९३

कळमनुरी १४८ ७१४७० ६७.८२

वसमत १५२ ७८८०३ ६९.००

औंढा नागनाथ १२२ ५९९९१८ ५२.६४

सेनगाव १३३ ९०९२६ ५२.७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT