Kharif Paisewari : परभणी जिल्ह्याची खरिपाची हंगामी पैसेवारी सरासरी ५२.९२

Kharif Season : जिल्ह्यातील यावर्षीच्या खरीप पिकांची हंगामी (नजर) पैसेवारी शनिवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जाहीर केली आहे.
Kharif Crop
Kharif CropAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यातील यावर्षीच्या खरीप पिकांची हंगामी (नजर) पैसेवारी शनिवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ८३२ गावांची नजरी पैसेवारी सरासरी ५२.९२ आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ८३२ गावांतील लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ५६ हजार ९५६ हेक्टर आहे. या गावातील यंदाचे (२०२३) पेरणीक्षेत्र ५ लाख १९ हजार ३१४ हेक्टरवर आहे.

Kharif Crop
Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ पैसे जाहीर

तर एकूण पडीक क्षेत्र ३७ हजार ६४१ हेक्टर आहे. जिल्हा प्रशासनाने घोषित केलेली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची खरीप पिकांची हंगामी (नजर) पैसेवारी ५१.५० ते ५५.३० पैसे तर जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ५२.९२ पैसे आली आहे. म्हणजेच ५० पेक्षा जास्त आली आहे.

Kharif Crop
Kharif Paisewari : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पैसेवारी कमी

जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ५२ मंडलांमध्ये यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांना पाण्याचा ताण बसला. त्यामुळे सर्वच खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाकडून ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित हंगामी पैसेवारी व १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांतील दुष्काळी स्थितीवर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा हंगामी पैसेवारी स्थिती

तालुका...गावांची संख्या...पेरणी क्षेत्र...पैसेवारी (पैसे)

परभणी...१२८...९६०८२...५३.००

जिंतूर...१६९...८३८९३...५२.२०

सेलू...९५...६२२२६...५१.४८

मानवत...५३...४२२४०...५३.२३

पाथरी...५६...३७३९२...५५.३०

सोनपेठ...५३...३३४२९...५१.५०

गंगाखेड...१०५...५९२०८...५२.००

पालम...८२...४६१२९...५५.००

पूर्णा...९४...५८७१५...५२.६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com