Vegetable Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Cultivation : अहिल्यानगर जिल्ह्यात ५६ हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड

Vegetable Farming : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात चारा पिकांसोबत भाजीपाला पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात चारा पिकांसोबत भाजीपाला पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सुमारे ५६ हजार ४९४ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली असल्याचे दिसून येत आहे. कोपरगाव, पारनेर, कर्जत तालुक्यांत भाजीपाला पीक यंदा अधिक आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी उपलब्ध असलेल्या भागात तसेच इतर पिके घेण्यासारखी स्थिती नाही, अशा भागात भाजीपाला उत्पादनाला प्राधान्य दिले जाते. अहिल्यानगर जिल्ह्यात मागील पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता बरी होती. आता पाण्याची पातळी खालावत असली तरी जे पाणी उपलब्ध आहे.

उन्हाळ्यात पाणी पुरेसे असे नियोजन करत भाजीपाला लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार यंदा आतापर्यंत ५६ हजार ४९४ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली आहे. त्यात कर्जतला अधिक क्षेत्र असून त्यापाठोपाठ कोपरगाव, पारनेर, राहुरी, संगमनेरला क्षेत्र अधिक आहे.

अहिल्यानगरला १०७० हेक्टर, पारनेरला ६०१५ हेक्टर, श्रीगोंद्याला १६४३ हेक्टर, कर्जतला २३२०१ हेक्टर, जामखेडला ३७९ हेक्टर, शेवगावला ५२३ हेक्टर, पाथर्डीला ५०९ हेक्टर, नेवाशाला १०० हेक्टर, राहुरीला ३३११ हेक्टर, संगमनेरला ४५९२ हेक्टर, अकोल्याला २६२८ हेक्टर, कोपरगावला ११२७६ हेक्टर, श्रीरामपूरला ३८२ हेक्टर व राहात्याला ८६४ हेक्टरवर भाजीपाला लागवड आहे.

काही भागात उन्हाचा चटका वाढल्याने अचानक पाणी पातळी खालावत असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्याची स्थिती चांगली असली तरी भाजीपाला उत्पादनाला पुढील काळात फटका बसण्याची शक्यता दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Karjmafi : कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचां उद्रेक होईल; डॉ. अजित नवलेंचा सरकारला इशारा

Indian Politics: किसमें कितना है दम!

Cotton Market : कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का?

Parliament Monsoon Session : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात कॉँग्रेसचे सरकारला आठ प्रश्न

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

SCROLL FOR NEXT