Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan: हिंगोली जिल्ह्यात खरीप पीककर्ज वाटपाचे ५५.३८ टक्के उद्दिष्ट साध्य

Kharif Crop Loan: यावर्षीच्या (२०२४) खरीप हंगामात (एप्रिल ते सप्टेंबर) हिंगोली जिल्ह्यातील बँकांना ८९१ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते.

Team Agrowon

Hingoli News: यावर्षीच्या (२०२४) खरीप हंगामात (एप्रिल ते सप्टेंबर) हिंगोली जिल्ह्यातील बँकांना ८९१ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात ६६ हजार ९५२ शेतकऱ्यांना ४९३ कोटी ८६ लाख ३ हजार रुपये पीककर्ज वाटप झाले असून पीककर्ज वाटपाचे ५५.३८ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. यंदा जिल्ह्यात केवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेची पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती झाली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दुसऱ्या क्रमांकावर असून व्यापारी बँक तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. सलग दुसऱ्या वर्षी खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले. हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ८९१ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते.

त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४६ कोटी ७ लाख रुपये, व्यापारी बँकांना ५६७ कोटी ५३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १७८ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यामध्येजिल्हा मध्यवर्ती सहकारी, विविध राष्ट्रीय बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मिळून एकूण १११ शाखा आहेत.

यंदा सप्टेंबर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३१ हजार ५१४ शेतकऱ्यांना ११९ कोटी ७५ लाख ६ हजार रुपये पीककर्ज देत ८१.९८ टक्के उद्दिष्ट साध्य केले.

राष्ट्रीय (व्यापारी) बँकांनी १४ हजार २१४ शेतकऱ्यांना १७३ कोटी ५८ लाख ९७ हजार रुपये पीककर्ज वाटप करत ३०.५९ टक्के उद्दिष्ट साध्य केले तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २१ हजार २२४ शेतकऱ्यांना २०० कोटी ५२ हजार रुपये पीककर्ज वाटप करत ११२.५४ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

गतवर्षी (२०२३) खरिपात ८७४ कोटी ९९ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात ८२ हजार ९४ शेतकऱ्यांना ६०७ कोटी १ लाख ५१ हजार रुपये (६९.३७ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बँकनिहाय खरीप पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बँक उद्दिष्ट वाटप टक्केवारी शेतकरी संख्या महाराष्ट्र ग्रामीण बँक १७८.१७ २००.५२ ११२.५४ २१२२४ जिल्हा सहकारी बँक १४६.०७ ११९.७५ ८१.९८ ३१५१४ व्यापारी बँका ५६७.५३ १७३.५८ ३०.५९ १४२१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

WISMA Demand : गाळप हंगाम १५ नोव्हेंबरलाच सुरू करा; विस्माची मागणी

Farmer Loan Waive : खानदेशात अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा

Tur Cultivation : खानदेशात पूर्वहंगामी तूर जोमात; १५ हजार हेक्टरवर लागवड

Rabi Sowing : ‘रब्बी’ पेरणीला जिल्ह्यात वेग

Kolhapur Assembly Elections : कोल्हापूर जिल्ह्यात दुरंगी आणि तिरंगी लढतीने धुरळा उडणार, बंडखोरांचे आव्हान

SCROLL FOR NEXT