District Planning Committee Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Fund Expenditure Planning : बीडसाठी ५४५ कोटी निधी खर्चाचे नियोजन

District Planning Committee Meeting : बीड जिल्ह्यामध्ये २०२४ - २५ साठी सुमारे ५४५ कोटी ४९ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आहे.

Team Agrowon

Beed News : बीड जिल्ह्यामध्ये २०२४ - २५ साठी सुमारे ५४५ कोटी ४९ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी (ता. १७) हा निर्णय घेण्यात आला. या खर्चाचे नियोजन ही लवकरच केले जाणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बीड जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षात खर्च करण्यात आलेल्या निधीच्या अहवालास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. मंजूर निधीतून सर्वसाधारण योजनेसाठी ४१४ कोटी, अनुसूचित जाती योजनांसाठी १२९ कोटी, तर ओटीएसपी योजनांसाठी दोन कोटी ४९ लाख रुपये इतका निधी आरक्षित करण्यात आलेला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने सुयोग्य नियोजन करून मागील वर्षीचा शंभर टक्के निधी पास प्रणालीवर खर्च केला, त्यामुळे पालकमंत्री मुंडे तसेच सर्वच लोकप्रतिनिधी यांनी नियोजन विभागाचे व प्रशासनाचे अभिनंदन व कौतुक केले.

बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचे संपूर्ण नियोजन करण्याचे अधिकार सर्वानुमते पालकमंत्री मुंडे यांना देण्यात आले. यासंबंधीच्या ठराव आमदार प्रकाश सोळंके व आमदार बाळासाहेब आजबे यांनी मांडला. त्याला अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी अनुमोदन दिले. या बैठकीस खासदार रजनीताई पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संदीप क्षीरसागर त्याचबरोबर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, बैठकीच्या शेवटी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शासन प्रशासनाचे सर्वच लोकप्रतिनिधींचे सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या वातावरणाच्या संदर्भात लक्ष वेधले. निवडणूक संपली मात्र तरीही विविध पक्षांचे कार्यकर्ते किंवा काही समाजकंटक हे विशेष करून सोशल मीडियावरून एखाद्या जाती धर्म किंवा राजकीय नेत्यांच्या संदर्भात द्वेष, अफवा व विष पेरणाऱ्या पोस्ट व्हायरल करत असून, त्यामुळे जातीय सलोखा बिघडवण्याची चिन्हे आहेत.

कुठल्याही जाती धर्मातील किंवा कोणत्याही पक्षाचे अनुयायी असलेले अगदी कोवळ्या वयातील तरुण या विखारी प्रचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी या बाबत जनजागृती करण्याचे तसेच शांततेचे आवाहन करण्याची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट जाणीवपूर्वक पसरवणाऱ्या विरोधात सक्तीने कडक कारवाई करावी, अशा सूचनाही मुंडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व सायबर विभागाला केल्या.

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांवरच आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचे सुयोग्य नियोजन केले जाईल.
धनंजय मुंडे, पालकमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT