Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : बीड जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीच्या ५४ टक्के पेरण्या

Rabi Sowing : रब्बी हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ५४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारी व हरभरा लागवडीकडे भर दिला असल्याने या दोन्ही पिकांचा पेरा अधिक होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Beed News : रब्बी हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ५४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारी व हरभरा लागवडीकडे भर दिला असल्याने या दोन्ही पिकांचा पेरा अधिक होण्याची शक्यता आहे. गव्हाचा पेरा आतापर्यंत केवळ २० टक्केच असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जोरदार व समाधानकारक पाऊस झालेला आहे. या वर्षीच्या पावसाची एक विशेष बाब म्हणजे, खरीप हंगामात वेळेवर पाऊस झाल्याने पेरणीस अडथळा आला नाही. मे महिन्याच्या अखेरपासूनच पावसाला सुरवात झाली होती. ७ जूनपूर्वी तीन ते चार पाऊस चांगले झाले होते. यामुळे पेरणी करण्यास शेतकऱ्यांना विलंब लागला नाही.

बीड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळी वाढली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. चांगला पाऊस झाल्याने यंदा पेरण्या मोठ्या प्रमाणात होतील व त्याच पटीत शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल असे सध्या तरी दिसून येत आहे.

वास्तविकत: रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती होण्याची फारशी शक्यता नसते. त्यामुळे शेती उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकते असा अंदाज आहे. पुढे प्रत्येक महिन्यात चांगला पाऊस झाला. पीक बहरात आल्यानंतर वेळोवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोटार लावण्याची वेळ आली नाही.

...असा झाला आहे पेरा

रब्बी ज्वारीची पेरणी ५९ टक्के, गव्हाची १९.७ टक्के, मका २०.१ टक्के, इतर तृणधान्य ५.५, हरभरा ५५.५, इतर कडधान्य ५१.१४, करडई ११ टक्के, जवस १५.३ टक्के, सूर्यफुल २५ टक्के व एकूण गळीत धान्य २८.६ टक्के, असा एकूण ५४.९ टक्के पेरा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT