Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : कुकडी प्रकल्पात ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

Water Crisis : मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा २.५० टीएमसी म्हणजे ८.४५ टक्क्यांनी कमी आहे.

Team Agrowon

Pune News : कुकडी प्रकल्पांतर्गत धरणात आजअखेर १५.९२५ टीएमसी (५३.६६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा २.५० टीएमसी म्हणजे ८.४५ टक्क्यांनी कमी आहे. पाणीसाठ्याची सद्यःस्थिती पाहता पाऊस लांबल्यास सात तालुक्यांतील शेतकऱ्यांना या वर्षी तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

शिल्लक पाणीसाठ्यात उन्हाळी एक आवर्तन सोडणे शक्य आहे. उन्हाळी आवर्तनाच्या नियोजनासाठी शनिवारी (ता. २४) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पुणे येथे होणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज पिंपळगाव जोगे, डिंभे या धरणांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता सुमारे ३० टीएमसी आहे. रब्बी हंगामाचे आवर्तन जानेवारीअखेर पूर्ण झाले आहे. उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी नगर, सोलापूर भागांतील शेतकऱ्यांकडून सुरू झाली आहे.

प्रकल्पीय पाणीसाठ्याचा वापर जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यांना सिंचन व बिगर सिंचनासाठी केला जातो. या वर्षी १५ ऑक्टोबर २०२३ अखेर कुकडी प्रकल्पात ९०.३८ टक्के (२७ टीएमसी) उपयुक्त साठा होता.

रब्बी हंगामासाठी वहनव्यय, गळती व प्रत्यक्ष सिंचन व बिगर सिंचनासाठी कुकडी प्रकल्पातील ९.८६ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सिंचनाचा विचार करता प्रकल्पातील किमान साडेनऊ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. आजअखेर धरणनिहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसी, (कंसात टक्के) : येडगाव : १.६१ (५९.७४ टक्के), माणिकडोह : ३.९५ (३८.८३ टक्के), वडज : ०.७६० (६४.८० टक्के), पिंपळगाव जोगे : १.१९१ (४९.१२ टक्के), डिंभे : ८.१३९ (६५.१४ टक्के).

पाऊस कमी झाल्याने या वर्षी कुकडी प्रकल्पात कमी पाणीसाठा झाला होता. सध्याच्या शिल्लक पाणीसाठ्यात जेमतेम उन्हाळी आवर्तन पूर्ण होईल. पाऊस लांबल्यास पुन्हा कालव्यात पाणी सोडणे शक्य होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून उन्हाळी हंगामातील पिकांचे नियोजन करावे.
- प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT