Tur Seed Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Seed Variety : बीडीएन ७११ वाणाच्या ५०० पिशव्या उपलब्ध

Tur Sowing : तूर बियाणे बॅग ६ किलोची असून, प्रति पिशवी १०५० रुपये दर असेल, असेही श्री. ठोंबरे म्हणाले. कपाशीवर गुलाबी बोड अळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत कृषी संशोधन केंद्र बदनापूर निर्मित तूर वाण बीडीएन ७११ च्या ५०० पिशवी विक्रीसाठी कृषी विस्तार शिक्षण केंद्रात उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी दिली.

याविषयी बीजप्रक्रिया केंद्र वनामकृवीचे प्रभारी अधिकारी यांनी डॉ. एस. बी. घुगे यांनी आश्‍वस्त केले होते. तूर बियाणे बॅग ६ किलोची असून, प्रति पिशवी १०५० रुपये दर असेल, असेही श्री. ठोंबरे म्हणाले. कपाशीवर गुलाबी बोड अळीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला.

अनेक उपाय करूनही शेवटी पिकाचे नुकसान झाले. यामुळे संभ्रमात असलेले शेतकरी पीक फेरपालट करण्याच्या मनःस्थितीत होते.

या वेळी त्यांच्या विचारांना आकार देण्याचे काम कृषी विस्तार यंत्रणेने केले. कापूस पिकास पर्याय म्हणून तूर पीक योग्य राहील असा संदेश कृषी संशोधक देत होते. यासाठी कृषी संशोधन बदनापूर निर्मित तूर वाण बीडीएन ७११ निश्‍चितपणे चांगला राहील, असे सांगण्यात आले.

विद्यापीठाने जिल्ह्याच्या ठिकाणी खरीप हंगामात सत्यता दर्शक बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन केले. यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. अशोक ढवण, त्याच बरोबर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, बियाणे विभागाचे डॉ. के. एस. बेग, डॉ. एस. बी. घुगे यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून मराठवाड्यात दूरवरच्या जिल्ह्यात विद्यापीठ निर्मित बियाणे उपलब्ध करून दिले.

चांगल्या उपक्रमाला शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने शेतकरी आणि कृषी विद्यापीठ यांच्यात जवळीक निर्माण झाली. सोयाबीन पिकात पीक काढणीस मजुरांची समस्या जाणवते त्यामुळे अशा परिस्थितीत एमएयूएस १६२ हा उभट वाढणारा वाण आहे.

या वाणाची देखील अनेक शेतकरी लागवड करतात या वाणाची देखील काही बॅग उपलब्ध होणार असल्याचे श्री. ठोंबरे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goda to Narmada Jalyatra: जल चळवळीतील कार्यकर्ते, संस्थांचा विसर

Agriculture Campaigns: खरीप हंगामासाठी राज्यात १८ मोहिमा राबविणार

Climate Resilient Farming: मराठवाड्यात उत्पादकता वाढीसाठी होणार हवामानानुकूल सुधारणा

Sugar Industry Problems Solution: साखर उद्योगांसमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती

Grape Pruning: द्राक्ष पट्ट्यात ‘खरड’ छाटणी वेगात

SCROLL FOR NEXT