Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Women Reservation : सरकारी नोकरीत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार

Rahul Gandhi : आपले सरकार येताच महिलांना दरवर्षी थेट बँक खात्यात एक लाख रुपये व सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण दिले जाईल,’’ असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. १३) येथे आयोजित सभेत दिले.

Team Agrowon

Dhule News : ‘‘महिलांना न्याय्य वागणूक अजूनही मिळत नाही. पण काँग्रेस महिलांना न्याय देईल. आपले सरकार येताच महिलांना दरवर्षी थेट बँक खात्यात एक लाख रुपये व सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण दिले जाईल,’’ असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (ता. १३) येथे आयोजित सभेत दिले.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी महिला परिषद घेतली व महिला, शेतकरी, नागरिकांशी संवाद साधला. सुरवातीला शहरात ‘रोड शो’ काढण्यात आला. यानंतर धुळे - आग्रा महामार्गावर एका मैदानात महिला परिषद झाली. या वेळी प्रभारी एम. चेन्नईथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, डॉ. अनिल भामरे आदी उपस्थित होते.

श्री. गांधी म्हणाले, ‘‘आम्ही महिला विकासाची चर्चा करतो. काश्मीर ते कन्याकुमारी अशी भारत जोडो यात्रा काढली होती. या दरम्यान आम्ही लोकांशी संवाद साधला. लोकांनी आम्हाला मणिपूर, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात अशी यात्रा काढा असे सांगितले आणि आम्ही ही यात्रा सुरू केली.’’

‘सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’

‘‘देशात गरीब, शेतकरी, महिलांवर अन्याय होत आहे. रोज देशातील ९० टक्के जनता भरडली जात आहे. देशात ७० कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे , तेवढा पैसा देशात २२ उद्योगपतींकडे आहे. त्यांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले जाते पण गरीब, शेतकरी दुर्लक्षित आहे. त्याला न्याय हवा आहे,’’ असे या वेळी श्री. गांधी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Loss: नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी भुईसपाट

Fuel Stock Solapur: इंधनाचा मुबलक साठा; पुरवठा सुरळीत ठेवा: जिल्हाधिकारी

Urea Import: खरिपासाठी १७ लाख टन युरिया खरेदीची तयारी, नॅशनल फर्टिलायझर्सने काढली निविदा

Parbhani Crop Loan: परभणी जिल्ह्यात खरीप पीककर्जाचे २.३३ टक्के उद्दिष्ट साध्य

Udid Seeds: अक्कलकोटमध्ये उडदाचे साडेआठ लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त

SCROLL FOR NEXT