Grape Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Subsidy : ‘द्राक्षालाही ५० टक्के अनुदान द्यावे’

Grape Farmer Demand : शासनाने संत्र्याप्रमाणेच द्राक्षावरील बांगलादेशातील आयात शुल्कावर ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Team Agrowon

Nashik News : बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या द्राक्षावर प्रतिकिलो १०६ रुपये आयात शुल्क द्यावे लागत असून, द्राक्ष बागायतदाराला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

त्यामुळे शासनाने संत्र्याप्रमाणेच द्राक्षावरील बांगलादेशातील आयात शुल्कावर ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्कात ५० टक्के सवलत दिली जाईल,बांगलादेशातील संत्र्यासाठी प्रतिकिलो ४४ रुपये अनुदान राज्य सरकारमार्फत देण्याचा निर्णय घेतला होता.

बांगलादेशात द्राक्षांवर आयात शुल्क १०६.७६ प्रतिकिलो असल्याने, संत्र्याप्रमाणेच द्राक्षावरील आयात शुल्काच्या ५० टक्के म्हणजेच ५३ रुपये अनुदान मंजूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष अॅड. रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, संचालक सुरेश कळमकर आदींनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार : जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT