Grape Covering Subsidy : द्राक्षबागांना प्लॅस्टिक कव्हर लावण्यासाठी स्वतंत्र योजना

Grape Crop Protection : अवकाळी पाऊस व गारपिटीपासून द्राक्षबागांचे संरक्षण होण्याकरिता प्लॅस्टिक कव्हरसाठी अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
Grape
Grape Agrowon

Pune News : अवकाळी पाऊस व गारपिटीपासून द्राक्षबागांचे संरक्षण होण्याकरिता प्लॅस्टिक कव्हरसाठी अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. आठ जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटण्याकरिता सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्लॅस्टिक कव्हरसाठी अनुदान मिळण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा जिल्ह्यांतील शेतकरी पात्र असतील.

या योजनेसाठी खर्चाचे मापदंड प्रतिएकर ४,८१,३४४ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. प्रतिलाभार्थी २० गुंठे ते एक एकर दरम्यान लाभ देय राहील. मात्र, अनुदान मर्यादा खर्चाच्या ५० टक्के किंवा प्रतिएकर २,४०,६७२ रुपये असेल.

अनुदानासाठी शेतकऱ्यांना आधी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावा लागणार आहे. तसेच, द्राक्षबागेच्या नोंदीसह सातबारा उतारा, आठ ‘अ’ उतारा, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खाते पुस्तिकेच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र, निश्चित केलेल्या नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र तसेच चतु:सीमा नकाशा अशी कागदपत्रे या योजनेसाठी सादर करावी लागतील.

Grape
Grape Orchard Damage : अज्ञाताकडून द्राक्ष वेली तोडून बागेची नासधूस

योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही निकष ठरण्यात आले आहेत. द्राक्षबागेत वाय सांगाड्यावर प्लॅस्टिक कव्हरसाठी एमएस अॅंगलचा पोल मध्यभागी वापरावा लागतो. त्याचा आकार कमीत कमी ३० x ३० x ५ मिलिमीटर असावा. तसेच पॉलिथिलीन पेपर व वाय आकाराचा सांगाडा यात किमान पाच फूट लांबीचा अँगलच्या तुकड्याची जोडणी करावी. त्यामुळे बागेतील वेलीस अनुकूल वातावरण ठेवता येईल, असा मुख्य निकष या योजनेचा आहे.

Grape
Grape Production : धनादेश न वटल्याने द्राक्ष व्यापाऱ्यास दणका

एक एकर द्राक्ष पिकाकरिता प्लॅस्टिक कव्हरचा वापर करावयाचा असल्यास पेपरच्या संरक्षणासाठी पॉलिथिलीनच्या किमान २५० प्लॅस्टिक कॅपचा वापर करावा. यूव्ही संस्करित पॉलिथिलीन ओव्हन लॅमिनेटेड फॅब्रिकची प्लॅस्टिक कव्हरची जोडणी करण्यासाठी मधल्या व बाजूच्या यूव्ही संस्करित पॉलिथिलीन वायर पाच मिमी जाडीची वापरावी.

प्लॅस्टिक पेपर व बाजूची पॉलीथिलीन वायर याची जोडणी करण्यासाठी प्लॅस्टिक एस हुकचा वापर करावा. या योजनेचे इतर निकष समजावून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करता येईल, असे फलोत्पादन विभागातून सांगण्यात आले.

राज्यातील द्राक्षबांगाना केवळ नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळवून देण्याइतपत या योजनेचा हेतू नाही. ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश फलोत्पादन विभागाने ठेवलेला आहे.
- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com