Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : परभणी, हिंगोलीत ५ लाख क्विंटल कापसाची खरेदी

Cotton Markat : यंदाच्या कापूस खरेदी हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. २०) पर्यंत सीआय आणि खासगी मिळून एकूण ५ लाख ९१ हजार ९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : परभणी ः यंदाच्या कापूस खरेदी हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. २०) पर्यंत सीआय आणि खासगी मिळून एकूण ५ लाख ९१ हजार ९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) १० केंद्रावर ३ लाख ६९ हजार ४६५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआयकडून हमीभावानुसार प्रतिक्विंटल किमान ७२७५ ते कमाल ७५२१ रुपये दर देण्यात आले. खासगी व्यापाऱ्यांकडून २ लाख ८१ हजार २७८ क्विंटल कापसाची प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७००० रुपये दराने खरेदी करण्यात आली.

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गंत यंदा परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, ताडकळस, हिंगोली, शिरडशहापूर या १० ठिकाणच्या १९ जिनिंग कारखान्यांमध्ये सीसीआय तर्फे किमान आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी केली जात आहे.

शुक्रवार (ता. २०) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ८ खरेदी केंद्रावर ३ लाख १६ हजार ४६५ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७५२१रुपये दर देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील २ खरेदी केंद्रावर ५२ हजार ७०० क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ७२०० ते कमाल ७४७१ रुपये दर मिळाले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४४ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी सुरु आहे.

शुक्रवार (ता. २०) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये २ लाख ९ हजार ६७२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७२०० रुपये दर मिळाले. हिंगोली जिल्ह्यात ५ जिनिंग कारखान्यांमध्ये ११ हजार ८७२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७१०० रुपये दर मिळाले, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

परभणी-हिंगोली जिल्हे कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

सीसीआयची खरेदी

केंद्र ठिकाण जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये

परभणी २ २१०९५ ७३१० ते ७४२१

जिंतूर १ ३६४२० ७१०० ते ७४२१

बोरी २ ५५००० ७१७२ ते ७४७१

सेलू ५ ८६१८५ ७१०० ते ७५२१

मानवत ३ ६४६१८ ७१७२ ते ७४७१

पाथरी १ ९४५३ ७१७२ ते ७४४५

गंगाखेड २ ३८४४३ ७४५३ ते ७४५९

ताडकळस १ ५५५१ ७४३३ ते ७४७१

हिंगोली १ २०३२२ ७२०० ते ७४७१

शिरडशहापूर १ ३२३७८ ७१७० ते ७४४१

खासगी कापूस खरेदी

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये

परभणी ४ १८८४८ ६९०० ते ७००५

जिंतूर ४ ११५६५ ६५०० ते ६९००

बोरी १ ३४९४ ६९०० ते ७१००

सेलू ६ ३४८६९ ६८५० ते ७११०

मानवत १३ ८१३१८ ६८०० ते ७१००

पाथरी २ ११९८१ ६८५० ते ७०५०

सोनपेठ १ १०३६७ ६९०० ते ७१००

गंगाखेड ६ ३०८७० ७००० ते ७२००

ताडकळस २ ६३६० ६९०० ते ७१००

हिंगोली ४ ८८०० ६८०० ते ७१००

शिरडशहापूर १ ३०७२ ६९०० ते ७१००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT