Cotton Procurement : परभणी, हिंगोलीत ७ लाख क्विंटलवर कापूस खरेदी

Cotton Market : कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून ६ लाख ७७ हजार ६७१ क्विंटल अशी एकूण ७ लाख ३७ हजार ८६९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Parbhani News : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोनअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत बुधवार (ता. ७)पर्यंत भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ६ केंद्रांवर ६० हजार १९८ क्विंटल व कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून ६ लाख ७७ हजार ६७१ क्विंटल अशी एकूण ७ लाख ३७ हजार ८६९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

कापसाला सीसीआयकडून प्रतिक्विंटल किमान ६६४० ते कमाल ७०२० रुपये दर मिळाले. खासगी व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल किमान ६७०० ते कमाल ६९९८ रुपये दर मिळाले.भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ५६ हजार ७४१ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ) येथील केंद्रावर ३४५७ क्विंटल अशी दोन जिल्ह्यांतील ६ केंद्रांवर ६० हजार १९८ क्विंटल कापसाची खरेदी झाली.

Cotton Market
Cotton Procurement : ‘पणन’कडून यंदा कापूस खरेदी नाही

खासगी व्यापाऱ्यांकडून जाहीर लिलावाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समिती अंतर्गत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये ६ लाख ३३ हजार १५९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

Cotton Market
Cotton Procurement : परभणी बाजार समितीत आजपासून कापूस खरेदी बंद

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्यांतर्गंतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ४४ हजार ५१२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. दोन जिल्ह्यांतील ४३ जिनिंग कारखान्यात ६ लाख ७७ हजार ६७१ क्विंटल, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण कापूस खरेदी दर रुपये

जिंतूर ११८३३ ६९२० ते ६९७०

बोरी १०४५१ ६९३० ते ६९७०

सेलू १४५८३ ६९७७ ते ६९९८

मानवत १९१६० ६९२० ते ७०२०

ताडकळस ७१४ ००

शिरडशहापूर ३४५७ ६७६१ ते ६९५०

खासगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

बाजार समिती कापूस खरेदी

परभणी ८९२३६ ६८०० ते ६९४०

सेलू १३९०१५ ६८०० ते ६९९८

मानवत २१०६५७ ६७५० ते ६७४५

गंगाखेड १०२९९ ६७०० ते ६९१०

सोनपेठ १८५४१ ६८०० ते ६९१०

जिंतूर ९८६६९ ६७०० ते ६८५०

बोरी ३१५८१ ६७०० ते ६८५०

पाथरी ११२०४ ६७०० ते ६९००

ताडकळस २३९५७ ६७०० ते ६९००

हिंगोली ४१३९० ६७०० ते ६८५०

आखाडा बाळापूर ३१२२ ६७०० ते ६८५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com