Maharashtra Earthquake agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Earthquake : महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेडसह परभणीत भूकंपाचे धक्के, ४.५ रिश्टर स्केल तीव्रता

Earthquake : महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेडसह परभणीत आज (ता.२१) सकाळी ६ वाजून १० मिनीटांच्या आसपास भूकंपाचा धक्का बसला.

sandeep Shirguppe

Earthquake Maharashtra : महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेडसह परभणीत आज (ता.२१) सकाळी ६ वाजून १० मिनीटांच्या आसपास भूकंपाचा धक्का बसला. पहिला धक्का ६ वाजून १० मिनीटांनी तर तर दुसरा धक्का ६ वाजून १९ मिनीटांनी जाणवला.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत असून नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने हा भूकंप ४.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात आले.

हिंगोलीसह परभणी नांदेडमध्ये भूकंपाचे दोन वेळा धक्के बसले. काही जून्या घरांना तडे गेल्याचे सांगण्यात येत असून या भूकंपाची खोली १० किमी होती. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडत असून मोकळ्या जागी जमा झाले होते. दरम्यान प्रशासनाकडून नुकसानाची पहाणी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आढावा घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT