Bajara Sowing : पुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर उन्हाळी बाजरीची पेरणी

Bajara Production : पुणे जिल्ह्यातील स्थिती; खेड तालुका अव्वल
Bajara Sowing
Bajara SowingAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Summer Bajara : पुणे ः उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढा आहे. शेतकऱ्यांनी दोन हजार ८७ हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये खेड तालुका अव्वल आहे. पेरणीक्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यात बाजरीचे सरासरी चार हजार २३३ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार हजारांहून अधिक हेक्टरवर पेरणी केली होती. यंदाही जवळपास तेवढ्याच क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग किडीचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात बाजरी पीक घेण्यावर भर दिला आहे.
आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करीत आहेत.

यंदा खेड तालुक्यात सर्वाधिक लागवड बाजरीची पेरणी झाली आहे. खेडमधील वाफगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सोयगाव, वेताळे आदी गावांत बाजरी आहे. जुन्नरमध्येही नारायणगाव, खोडद, बोरी, बेल्हे, हिवरेतर्फे, आळेफाटा, मांजरवाडी, वारूळवाडी, ओतूर, रोकडी, उब्रज, डिंगोरे, आर्वी, कुरण, कांदळी, निमगाव चावा, तर आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर, नागापूर, अवसरी, धामणी, कळंब, मंचर, पेठ आदी गावांत बाजरीला पसंती मिळाली आहे.

Bajara Sowing
Summer Sowing : उन्हाळी पिकांची १६ हजार हेक्टरवर पेरणी

दरवर्षी पावसाळ्यात रोग, किडीमुळे उत्पादन घट येते. उन्हाळी हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी हंगामातील बाजरीची पेरणी करतात. यंदा खेड, जुन्नर तालुक्यात पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

तालुकानिहाय उन्हाळी बाजरीची पेरणी (हेक्टर)
तालुका---सरासरी क्षेत्र---बाजरीची पेरणी
खेड---११३४---१४०६
जुन्नर---२०६०---४८
आंबेगाव---६९७---४४०
मावळ---१७६---६८
शिरूर---५९---६३
बारामती---४---२३
इंदापूर---०---११
मुळशी---२२---२८
एकूण---४२३३---२०८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com