Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोलापूर विभागात अद्यापही ४४० कोटींची ‘एफआरपी’ थकली

Sugarcane Season : चालू गाळप हंगामात सोलापूर विभागातील ३३ कारखान्यांकडे ३१ जानेवारीअखेर ४३९.७५ कोटी रुपये ‘एफआरपी’ थकली आहे.

Team Agrowon

Solapur News : चालू गाळप हंगामात सोलापूर विभागातील ३३ कारखान्यांकडे ३१ जानेवारीअखेर ४३९.७५ कोटी रुपये ‘एफआरपी’ थकली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील २५ कारखान्यांनी ३६४.५७ कोटी रुपये एफआरपी थकवली आहे.

सोलापूर विभागात सोलापूर व धाराशिव जिल्हे समाविष्ट आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३५, तर धाराशिव जिल्ह्यातील १४ अशा एकूण ४९ कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३४ कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीनुसार एफआरपीचे दोन हजार ४० कोटी व धाराशिव जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ५४० कोटी, असे एकूण दोन हजार ५८० कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना दिले आहेत. सोलापुरातील २५ कारखान्यांकडे ३६४.५७ कोटी, तर धाराशिवमधील ८ कारखान्यांकडे एफआरपीचे ७५.१८ कोटी रुपये थकित आहेत.

दीड कोटी टन गाळपाचा टप्पा ओलांडला

यंदाच्या हंगामात सोलापूर विभागाने ५ फेब्रुवारीअखेर एक कोटी ५६ लाख ६९ हजार ५७८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी ३९ लाख ४५ हजार ८५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ८.९ टक्के आहे.

सोलापूर जिल्ह्यात एक कोटी २१ लाख १४ हजार ३३६ टन गाळप झाले असून, ८.९६ टक्के साखर उताऱ्याने एक कोटी आठ लाख ५० हजार २०५ क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात ३५ लाख ५५ हजार २४२ टन गाळप होऊन ३० लाख ९४ हजार ८८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. धाराशिव जिल्ह्याचा साखर उतारा ८.७१ टक्के आहे.

कारखानानिहाय थकित एफआरपी (कोटींत)

सोलापूर जिल्हा

कारखाना थकित एफआरपी

सिद्धेश्‍वर १६.७४

संत दामाजी २०.०२

संत कूर्मदास २.९४

लोकनेते ४५.८२

लोकमंगल, बिबीदारफळ १.८७

लोकमंगल, भंडारकवठे ६.१५

विठ्ठल कार्पोरेशन ५६.७४

सिद्धनाथ १.०४

जकराया ५.२८

इंद्रेश्‍वर १०.९८

भैरवनाथ, विहाळ २३.५२

भैरवनाथ, लवंगी २४.३०

युटोपियन ६.८४

मातोश्री २६.९८

भैरवनाथ, आलेगाव १४.३०

बबनरावजी शिंदे ३.३५

जयहिंद २४.६१

विठ्ठल रिफाइंड १६.२३

आष्टी शुगर ५.२५

भीमा १०.२७

सहकार शिरोमणी १.४७

धाराशिव, सांगोला १०.५७

श्री. शंकर ३.२६

आवताडे शुगर्स २.०८

विठ्ठल, वेणूनगर २३.९६

धाराशिव जिल्हा

विठ्ठलसाई २०.०९

भैरवनाथ (शिवशक्ती) १०.९३

भीमाशंकर ४.६९

भैरवनाथ, सोनारी १४.५७

लोकमंगल माउली ५.६०

क्यूएनर्जी २.३२

गोकुळ शुगर ७.४५

भैरवनाथ (तेरणा) ९.५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Panjabrao Deshmukh Memorial Award: डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्र्यांना जाहीर

Kharif Onion Cultivation: लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर

APMC Reforms: ‘बाजार व्यवस्थेवर आता सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण’

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती

Market Committee Democracy: पणनमंत्र्यांकडील अध्यक्षपद बाजार समित्यांच्या मुळावर: राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT