Pune Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Dam Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत दोन दिवसांत ४४ टीएमसी पाणी

Pune Rain : अकरा धरणांतील पाणीपातळी ८० टक्क्यांवर

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस पडला. धरणांत नव्याने ४४.१५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे ११ धरणांतील पाणीपातळी ही ८० टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्यामुळे धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे. उर्वरित धरणांतील पाणीपातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली आहे. मुठा, पवना, आरळा, भीमा, इंद्रायणी, कानंदी, नीरा, मीना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रांत पावसाची चांगलीच संततधार सुरू होती. परंतु बुधवारपासून (ता. २४) पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिश्‍चिम भागात जोर अधिक असला, तरी पूर्व भागातही हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. शुक्रवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कुंडली घाटमाथ्यावर सर्वाधिक २७३, तर ठोकरवाडी २४०, शिरोटा २२०, लोणावळा २२१, तर वळवण येथे १९८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणांत पाण्याची मोठी आवक झाली आहे.

शुक्रवारी (ता. २६) धरण क्षेत्रांत पावसाचा जोर काहीसा कमी झाला. परंतु घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच होती. मुळशी घाटमाथ्यावर २५४, मुठा खोऱ्यातील टेमघर धरण क्षेत्रात १७०, वरसगाव १३२, पानशेत १२९, तर खडकवासला धरणक्षेत्रात ७४ मिलिमीटर पाऊस पडला. नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात
१७४, पवना १६७, भामा आसखेड १५७, आंध्रा १५१, वडिवळे १६८, कळमोडी ९२, चासकमान ६९, गुंजवणी ७५, भाटघर ५९, वीर ३४, तर नाझरे धरण क्षेत्रात २० मिलिमीटर पाऊस पडला.

कुकडी खोऱ्यातील धरण क्षेत्रात मध्यम पाऊस झाला. वडज धरण क्षेत्रात ६५, डिंभे ४८, पिंपळगाव २७, माणिकडोह २३, चिल्हेवाडी २०, घोड ३४, तर येडगाव धरण क्षेत्रात १० मिलिमीटर पाऊस झाला. विसापूर आणि उजनी धरण क्षेत्रात तुरळक सरी बरसल्या.

शुक्रवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतचा विसर्ग (क्युसेक)
धरण ---विसर्ग
खडकवासला---१५,४६७
कासारसाई---१६००
कळमोडी---२९७४
चासकमान---६२८०
वडिवळे---२१७२
गुंजवणी---३०४०
वीर---६२९०
येडगाव---५००
वडज---४३००
चिल्हेवाडी---२०००
मुळशी---१०,७००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT