Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : मे महिन्यातही प्रकल्पांत ४३ टक्के जलसाठा

Unseasonal Rain : यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रकल्पात ४२.५६ टक्के जलसाठा आहे.

Team Agrowon

Water Stock in Yavatmal : यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रकल्पात ४२.५६ टक्के जलसाठा आहे. तीन मोठे, सात मध्यम व ६५ लघू अशा एकूण ७५ प्रकल्पाची ही स्थिती आहे.

पावसाळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले. जिल्ह्यात पूस, अरुणावती, बेंबळा हे मोठे प्रकल्प आहे. तर अडाण, नवरगाव, गोकी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव हे मध्यम प्रकल्प आहेत.

मोठ्या प्रकल्पात ३९.८६, मध्यम प्रकल्पात ५१.२० तर ६५ लघुप्रकल्पात ३८.५३ टक्के जलसाठा आहे. दरवर्षी मे महिन्यात प्रकल्पातील पाणी तळ गाठते. त्यामुळे पशुधनासह ग्रामीण भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.

पाण्याच्या शोधात मजुरांना मजुरीवरही पाणी फेरावे लागते. यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तर, दुसरीकडे जलसाठा ४२.५६ टक्क्यांच्या घरात आहे. प्रशासनाच्या लेखी उपयुक्त जलसाठा ३९८.९८ दलघमी आहे.

प्रकल्पात जलसाठा असल्याने कुठेही पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट अजूनही थांबली नाही. प्रकल्पात पाणी असल्याने जंगलक्षेत्रातील वन्यप्राणी प्रकल्पस्थळाकडे धाव घेत असल्याचे दिसून येते.

मोठे प्रकल्प टक्केवारी

पूस - ४९.५१

अरुणावती - ३५.३३

बेंबळा - ३९.२५

लघूप्रकल्प टक्केवारी

अडाण - ४६.९०

नवरगाव - ४५.६५

गोकी - ६३.७६

वाघाडी - ४७.८८

सायखेडा - ३७.०७

अधरपूस - ५९.२०

बोरगाव - २९.८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT