Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Producer : धान उत्पादकांचे ४१ कोटी रुपये अद्याप थकित

Team Agrowon

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गंत असलेल्या हमीभाव केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचे तब्बल ४१ कोटी रुपये थकले आहेत. दोन महिन्यांपासून थकीत चुकाऱ्यांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.

धान उत्पादकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये याकरीता बाजार हस्तक्षेप योजना राबविली जाते. त्याकरिता आदिवासी विकास मंडळ तसेच मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून खरेदी होते. यंदा ऑक्टोबर २०२३ पासून खरेदीला सुरुवात झाली.

परंतु काही केंद्र नोव्हेंबर, तर काही डिसेंबर महिन्यात सुरू झाले. खरीप हंगामातील धान खरेदीसाठी असलेल्या आदिवासी विकास मंडळाच्या केंद्रावर ४० हजार ९०६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मार्केटिंग फेडरेशनला धानाचा पुरवठा करण्यासाठी ३४ हजार १५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

त्यानुसार जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६४ शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आल्याचे पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यातील मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानापैकी ९१,१६,०८.२२५ रुपयांचे चुकारे केले. त्यानंतरही त्यांचे सात कोटी ४० लाख ११ हजार ५५८ रुपयांचे चुकारे थकीत आहे

आदिवासी विकास मंडळाकडून २० हजार ३८९ शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला. त्यापोटी ६ कोटी १५ लाख ७७ रुपयांचे चुकारे प्रदान करण्यात आले. त्यानंतरही ३३ कोटी ७९ लाख ४६ हजार ७१५ रुपयांचे चुकारे थकीत आहेत. एकूण ४१ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने थकीत चुकारे अदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT