Group Farming : संत्रा उत्पादकांना गटशेती, मार्केटिंग तंत्रातून सापडले उत्पन्न वाढीचे सूत्र

Orange Cultivation : वाशीम जिल्ह्यात संत्रा लागवड, अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी निकोप स्पर्धेला गेल्या काही वर्षांत प्रारंभ झाला आहे.
Group Farming
Group Farming Agrowon

Orange Production : वाशीम जिल्ह्यात संत्रा लागवड, अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी निकोप स्पर्धेला गेल्या काही वर्षांत प्रारंभ झाला आहे. शेतकरी आपापसात चर्चा करून मार्केटिंगमध्ये बदल करू लागले. शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादनासोबत विपणन आणि प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठी प्रगती साधली.

वाशीम जिल्ह्यात संत्रा पिकाच्या क्षेत्रात वाढ दिसून येत नव्हती. २०१४-१५ मध्ये फक्त सुमारे १९०० हेक्टर एवढे क्षेत्र होते आणि उत्पादकता ९.२१ टन हेक्टरी होती. वाशीम कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या शाखेतर्फे गावागावांत जाऊन अभ्यास केला गेला.

यातून गटशेती हे सर्वांत महत्त्वाचे विस्तार साधन आहे हे समजून घेत २०१८ मध्ये या ११ शेतकऱ्यांसोबत इतर जुन्या बागा असलेल्या ४ शेकऱ्यांसहित एकूण १५ शेतकऱ्यांसोबत केव्हीकेने दत्तक गांव वडजी येथे गट शेतीचा श्रीगणेशा केला.

Group Farming
Group Farming : गटशेतीतून इराणला केळी निर्यात

...अशी झाली गटशेतीला सुरुवात

केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी सुरुवातीला निवडक शेतकऱ्यांच्या बागांवर लक्ष केंद्रित करून संपूर्ण तंत्राची अंमलबजावणी करून घेतली. यामध्ये वडजी येथील राजेश बोरकर या शेतकऱ्याची निवड केली. बोरकर हे बाग काढून टाकण्याच्या मनःस्थितीत पोहोचले होते. अशा दोन एकर बागेतून २०१६ मध्ये ४ लाख ९१ हजार रुपयांचे तर २०१७ मध्ये ४ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न काढण्यात आले.

ही बाब इतर शेतकऱ्यांना लक्षात आली व सर्व प्रथम ११ शेतकऱ्यांचा गट तयार झाला. २०१७ मध्ये नागपूर जिल्ह्यातील बागांची पाहणी करण्यासाठी अभ्यास दौरा काढला. गट शेतीची सुरुवात करीत ११ शेतकऱ्यांनी १ हेक्टर क्षेत्रावर घन पद्धतीने खड्डे घेण्यापासून ते ठिबकपर्यंत संपूर्ण तंत्राचा पुरेपूर वापर करून लागवड केली. गटशेती हे सर्वात महत्त्वाचे विस्तार साधन आहे हे समजून घेत २०१८ मध्ये या ११ शेतकऱ्यांसोबत इतर जुन्या बागा असलेल्या ४ शेतकऱ्यांसहित एकूण १५ शेतकऱ्यांसोबत केव्हीकेने दत्तक गाव वडजी येथे गट शेतीचा श्रीगणेशा केला.

Group Farming
Orange Processing Center : संत्रा प्रक्रिया केंद्र निर्मितीला मंजुरीमुळे शेतकरी सुखावला

मार्केटिंग बदलले

सद्यःस्थितीत गटशेतीतील बहुतांश शेतकरी हे सामूहिकपणे २२ किलोच्या क्रेट प्रमाणे व्यवहार करीत असून, जुन्या विक्री पद्धतीपेक्षा जवळपास दीड पट अधिक पैसा मिळवत आहेत.

संत्र्याचा तयार झाला ब्रँड

‘केव्हीके’ने संत्रा उत्पादक शेतकऱ्याची कंपनीसुद्धा सुरू केली असून, वाशीम जिल्ह्याच्या संत्र्याचा ‘वाव’ Washim Orange (WAO) असा ब्रॅण्ड सुद्धा तयार केला. मागील वर्षी १००० बॉक्सची विक्री तसेच काही गिफ्ट स्वरूपात देऊन प्रमोशन करण्यात आले. केव्हीकेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ रवींद्र काळे यांचे पाठबळ मिळते आहे.

या सोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा, जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमाला तत्कालीन मुख्य कृषी सचिव एकनाथ डवले, कुलगुरू डॉ. शरद गडाख या मान्यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

गटशेती उपक्रमाचे फलित...

गटशेती या उपक्रमाचे फलित म्हणून आज वडजी येथे १०४ शेतकऱ्यांचा गट निर्माण होऊन ३५० एकरांवर संत्रा पिकाची लागवड झाली. बेलखेडा येथे ५२ शेतकऱ्यांचा गट होऊन गावात ३०० एकरांवर संत्रा बागा तयार झाल्या आहेत. या दोन्ही गावांची सरासरी उत्पादकता ही हेक्टरी ३५ टनावर गेली असून, फळांची व बागांची प्रत ही समाधानकारक व निरोगी आहे.

- निवृत्ती पाटील, उद्यानविद्या तज्ज्ञ, केव्हीके, करडा, वाशीम. ९९२१००८५७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com