संग्रहित छायाचित्र 
ॲग्रो विशेष

Pune Rain : संततधारेने दौंड तालुक्यात ४०० गुऱ्हाळघरे बंद

Jaggery Production : सलग पावसामुळे तालुक्यातील ४०० परप्रांतीय गुऱ्हाळे व २०० वीटभट्ट्या अद्याप बंद आहेत. जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच सलग एवढा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे.

Team Agrowon

Pune News : दौंड : सलग पावसामुळे तालुक्यातील ४०० परप्रांतीय गुऱ्हाळे व २०० वीटभट्ट्या अद्याप बंद आहेत. जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच सलग एवढा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे. भरीस भर म्हणून मुळा, मुठा व भीमा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठची सर्व गावे प्रभावित झाली असून नदीकाठच्या शेतातील उभ्या पिकांत पाणी शिरले आहे.

प्रशासनाने मुळा-मुठा नदीत खडकवासला प्रकल्पातील पाणी सोडल्याने नदीकाठचे शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाण्याखाली गेले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी (ता. २६) पाणी पातळी उतरल्याने दिवसभर अनेक शेतकरी नदीकाठचे बुडालेले विद्युतपंप बाहेर काढताना दिसले. गुऱ्हाळघरे व वीट भट्टी बंद असल्याने अनेक परप्रांतीय कामगार हे नदीकाठी मासेमारी करण्यासाठी आले. एकूणच सलग ३ दिन दिवसांच्या पावसानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली.
गुऱ्हाळ चालक सोमनाथ ताकवणे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. या पावसाने गुऱ्हाळ गेले काही दिवस बंद आहेत. त्यामुळे गुऱ्हाळाच्या कडेने ऊस गाळपासाठी साठला आहे. दोन दिवसांत जनजीवन स्थिर झाल्यानंतर सर्व स्थिती पूर्ववत होईल.’’

शेतकरी संतोष कोंडे म्हणाले, ‘‘नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT