Agricultural Festival  Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Agricultural Festival : नगर महोत्सवात तीन दिवसांत सुमारे सव्वाचार कोटींची उलाढाल

चार दिवसांपासून सुरू असलेल्या महोत्सवाचा आज (ता. १४) रोजी शेवटचा दिवस आहे.

Team Agrowon

Nagar Agricultural Festival News : येथील न्यू आर्ट्‌स महाविद्यालयाच्या प्रांगणावर सुरू असलेल्या कृषी विभाग (Agricultural Department), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन विभाग यांच्या ‘नगर महोत्सवात’ (Nagar Festival) तीन दिवसांत सुमारे सव्वाचार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

सोमवारी (ता.१३) चौथ्या दिवशीही लोकांचा उत्साह कायम दिसला. चार दिवसांत लाखो लोकांनी भेट देऊन खरेदी करत खाद्य पदार्थांचाही आनंद लुटला.

शेतकऱ्यांचा शेतमाल, महिला बचतगटाने (Women's self-help group) तयार केलेल्या साहित्याची विक्री व प्रदर्शन तसेच शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी यंदा कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन विभाग (Department of Animal Husbandry) यांच्या संयुक्तपणे ‘नगर महोत्सव' होत आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या महोत्सवाचा आज (ता. १४) रोजी शेवटचा दिवस आहे. मात्र चारही दिवस नगर शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला आहे.

यंदा तीनही उपक्रम एकत्र केल्याने लोकांची सोय झाल्याने अधिक प्रमाणात महिला, मुले, नागरिक, शेतकरी महोत्सवाला आल्याचे पाहायला मिळाले.

महोत्सवात तीन दिवसांत सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यात कृषी विभागाच्या स्टॉलमधून पावणेतीन कोटी तर महिला बचतगटाच्या माध्यमातून सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा महोत्सवात सुमारे साठ लाखांच्या यांत्रिकीकरणाची खरेदी झाल्याचे सांगण्यात आले. पाच दिवसांच्या महोत्सवात नेहमीपेक्षा सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दररोज सायंकाळी महिला, नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम होत असल्याने त्यासह खाद्य पदार्थांचा आनंद घेण्यासाठी खाऊ गल्लीत लोकांची गर्दी ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सोना-मोती गव्हाचे आकर्षण

कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन विभाग यांच्या ‘नगर महोत्सवात’ वांबोरी (ता. राहुरी) येथील ग्रीनअप शेतकरी कंपनीमधील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ‘सोना-मोती’ गव्हाचे आकर्षण दिसून आले.

इतर गव्हापेक्षा वेगळा दिसणारा आणि साधारणपणे गोल आकार असलेला हा गहू लोकांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला. या गव्हाचे फायदे काय? एकरी किती उत्पादन होते? यांसह इतर बाबतीत शेतकरी, ग्राहक चौकशी करत होते.

या गव्हाला प्रतिसाद चांगला मिळाला असे ग्रीनअपचे अध्यक्ष सचिन ठुबे यांनी सांगितले. पशुप्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Sale Controversy: ‘यशवंत’च्या जमीन विक्रीस अखेर परवानगी

E-Crop Inspection: आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ‘ई-पीक पाहणी’ आवश्यक

Rover Machines: शासनाकडून बाराशे रोव्हर खरेदीस मान्यता

Ganesh Chaturthi 2025: ‘श्रीं’चे दिमाखात आगमन

India-US Trade: कापड आणि कोळंबी उद्योगाला हादरे

SCROLL FOR NEXT