Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात ३९.८५ टक्के पीककर्ज वाटप

Crop Loan Disbursement : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात सोमवार (ता. ८) पर्यंत ५१ हजार ६४७ शेतकऱ्यांना ३५५ कोटी ३५ लाख २० हजार रुपये (३९.८५ टक्के) पीककर्ज वाटप झाले आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात सोमवार (ता. ८) पर्यंत ५१ हजार ६४७ शेतकऱ्यांना ३५५ कोटी ३५ लाख २० हजार रुपये (३९.८५ टक्के) पीककर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ९२.०५ टक्के कर्जवाटपकरून आघाडी घेतली आहे. त्यानंतर जिल्हा बँकेचे (६७.३२ टक्के) कर्जवाटप आहे. तर राष्ट्रीयीकृत बँका (१६.३९ टक्के) पिछाडीवर आहेत.

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण १ हजार ४०९ कोटी ९६ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात खरिपातील ८९१ कोटी ७७ लाख रुपये आणि रब्बीतील ५१८ कोटी १९ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४१ शाखा आहेत. भारतीय स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांच्या (व्यापारी बँका) ३८ शाखा, खाजगी बँकांच्या ९ शाखा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २३ शाखा अशा एकूण १११ शाखा आहेत. यंदाच्या खरिपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४६ कोटी ७ लाख रुपये, व्यापारी बँकांना

५६७ कोटी ५३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १७८ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

...असे झाले कर्ज वितरण

सोमवार (ता. ८) अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २६ हजार ५९७ शेतकऱ्यांना ९८ कोटी ३३ लाख २३ हजार रुपये (६७.३२ टक्के), राष्ट्रीयीकृत बँकांनी ७ हजार ८८० शेतकऱ्यांना ९३ कोटी १ लाख ७ हजार रुपये (१६.३९ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १७ हजार १७० शेतकऱ्यांना१६४ कोटी ९० हजार रुपये (९२.०५ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT