Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे ३९ हेक्‍टरचे नुकसान

Crop Damage : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे ४० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे ४० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वधिक नुकसान मका आणि भाजीपाला उत्पादकांचे झाले असून शेतकऱ्यांमधून भरपाईची मागणी होत आहे.

भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही हंगामापासून व्यावसायिक पिकांवर भर दिला जात आहे. त्याकरिता सिंचनाच्या सोयी बळकटीकरणावरही शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्याआधारे मका, भाजीपाला लागवड केली जाते. डिसेंबर महिन्यात लावलेला मका आता परिपक्‍व झाला आहे.

अशातच अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळ, वारा, गारपिटीमुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला व आंबा पिकालाही बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात २३ गावांतील १०४ शेतकऱ्यांचे सुमारे ३९.७० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात आहेत. त्यामुळे राजकारण्यांनी देखील आपत्तीकाळात वाऱ्यावर सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून मका लागवड केली. पिकांचे व्यवस्थापनातून चांगला पैसा होईल, अशी अपेक्षा त्यांना होती.

...असे आहे नुकसान

तालुका तसेच क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

गडचिरोली २०.६०

धानोरा १०

कुरखेडा ९.१०

एकूण ३९.७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Onion Raid: ‘नाफेड,’ ‘एनसीसीएफ’च्या कांदासाठा तपासणीसाठी धाडी

Ginger Price: आले दरात सात हजार रुपयांपर्यंत सुधारणा

Nafed Onion Procurement: अवसायनात गेलेल्या कांदा खरेदी करणाऱ्या संस्थेवरील कारवाईस स्थगिती

Agriculture University Recruitment: कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी

Horticulture Scheme: फलोत्पादन प्रकल्पासाठी २५ कोटींपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT