Unseasonal Rain : ‘अवकाळी’ने ५२५६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

Crop Damage Due to Hail : मराठवाड्यात आठही जिल्ह्यात ९ एप्रिल पासून १६ एप्रिलपर्यंत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे क्षेत्र ५२५६ हेक्टरवर पोहोचले आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात आठही जिल्ह्यात ९ एप्रिल पासून १६ एप्रिलपर्यंत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे क्षेत्र ५२५६ हेक्टरवर पोहोचले आहे. प्रशासनाने तसा प्राथमिक अहवाल दिला आहे. ११ एप्रिल पर्यंत ही क्षेत्र २७१६ हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने दिला होता.

मराठवाड्यात साधारणतः ९ एप्रिल पासून अवेळी पाऊस वादळ व गारपिटीमुळे जिरायती, बागायत व फळ पिकांचे नुकसान सातत्याने सुरू आहे. मराठवाड्यातील ४८१ गावांमध्ये नैसर्गिक आपत्तीने पिकांची हानी केली आहे.

सुरवातीला ९ ते ११ एप्रिल दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २७१६ हेक्टरवरील शेती पिकाचे अवेळी पाऊस गारपिटीमुळे नुकसान झाले होते. त्यानंतरही अवेळी पाऊस, गारपीट, वादळ कायम असल्याने नुकसानीच्या क्षेत्रात आता वाढ झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या दुसऱ्या प्राथमिक अंदाजानुसार आठवी जिल्ह्यातील ९१२७ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अवकाळी पाऊस गारपिटीने मोठे नुकसान केले आहे.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : मॉन्सूनपूर्व पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये २३७ हेक्टर, जालन्यामध्ये ९९० हेक्टर, परभणीमध्ये ५३९ हेक्टर, हिंगोलीमध्ये ३३० हेक्टर, नांदेडमध्ये ८२० हेक्टर, बीडमध्ये सर्वाधिक १६९३ हेक्टर, लातूरमध्ये ३२४ हेक्टर तर धाराशिव मध्ये ३२१ हेक्टरवरील जिरायती, बागायत व फळ पिकाचे नुकसान झाले आहे.

अवेळी पाऊस, गारपिटीचा सत्र अजूनही सुरूच असून या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत. नुकसान झालेल्या एकूण ५२५६ हेक्टरमध्ये ७०० हेक्टरवरील जिरायती, ३२३१ हेक्टरवरील बागायत तर १३२५ हेक्टरवरील फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीचा समावेश आहे.

दहा जणांचे गेले प्राण

९ ते १६ एप्रिल दरम्यान मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील दोन, परभणीतील दोन, हिंगोलीमधील एक, बीड मधील तीन, लातूरमधील दोन व्यक्तींचा समावेश आहे याशिवाय दहा व्यक्ती या नैसर्गिक आपत्तीत जखमी झाल्या आहेत. त्यामध्ये धाराशिव लातूर व छत्रपती संभाजीनगर मधील प्रत्येकी एक, बीडमधील तीन तर नांदेड मधील चार व्यक्तींचा समावेश आहे.

१५२ जनावरे दगावली

मराठवाड्यातील १५२ जनावरांची आजवरच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवित हानी झाली आहे. त्यामध्ये ३५ लहान व ८२ मोठी दुधाळ जनावरे, ३ लहान व ३२ मोठी ओढकाम करणारी जनावरे यांचा समावेश आहे.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : नागपुर विभागात ७८६ हेक्टरमधील पिकांचे अवकाळीमुळे नुकसान

निवडणुकीच्या जोरात पंचनाम्याचा घोर

सद्यःस्थितीत विविध विभागातील कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानीचे सत्र ही सातत्याने सुरू आहे. एकीकडे निवडणूक कामाची लगबग दुसरीकडे ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामसेवक तलाठी व कृषी सहाय्यकांकडे अशा नुकसानीच्या वेळी पंचनामे यांची जबाबदारी.

निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी महत्त्वाची मात्र या दुहेरी जबाबदारीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याला विलंब होऊ नये, शिवाय खरिपाचे खत बियाणे उपलब्धता व इतर नियोजन कोलमडू नये म्हणजे झाले, अशी भावना नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

पावसाचा जोर काय आहे

दरम्यान बुधवारी (ता. १६) छत्रपती संभाजीनगर मधील ढोरकिन बजाज नगर लोहगाव शेंदूरवादा आडगाव बुद्रूक आडुळ देवगाव थापटी गेवराई बुद्रूक कडेठाण आधी परिसरात अवकाळी पावसाची वादळासह कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली बजाज नगरात वीज पडण्याची घटना घडली तर गेवराई बुद्रूक येथील घरांवरची तीन पत्रे उडाली.

जिल्हानिहाय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या

जिल्हा शेतकऱ्यांची संख्या

छत्रपती संभाजीनगर ४४०

जालना १७३८

परभणी ८०६

हिंगोली ६०३

नांदेड १०७६

बीड ३६५७

लातूर ५०४

धाराशिव ३०३

मृत पावलेल्या जनावरांची संख्या

छत्रपती संभाजीनगर ११

जालना ४२

परभणी १३

हिंगोली ९

नांदेड २४

बीड २२

लातूर १३

धाराशिव १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com