Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील नागरी भागात एकूण १०६ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ता व पाणीपट्टी कर वसूल होणे अपेक्षित आहे. कर वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे २० मार्चपर्यंत ३९ कोटी ९४ लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे. मार्च अखेरपर्यंत यामध्ये आणखी सुधारणा होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील माढा, श्रीपूर-महाळुंग, वैराग, नातेपुते व माळशिरस या पाच नगरपंचायतींवर सध्या लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. उर्वरित १२ नगरपरिषदा व नगरपंचायतीवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकच कार्यरत आहेत. प्रशासकांच्या काळात मालमत्ता व पाणीपट्टी करवसुली अधिक संधी असते.
सध्या मार्च अखेरची धावपळ सुरू असल्याने मार्च अखेरच्यामित्ताने मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली होईल अशी अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा, करमाळा, सांगोला, कुर्डुवाडी, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ, अकलूज या १२ ठिकाणी नगरपरिषद कार्यरत आहेत.
निवडणुका नसल्याने या सर्व ठिकाणी प्रशासक कार्यरत आहेत. माढा, महाळुंग-श्रीपूर, वैराग, नातेपुते, अनगर व माळशिरस या सहा ठिकाणी नगरपंचायती अस्तित्वात आहेत. अनगर वगळता अन्य ठिकाणी लोकप्रतिनिधी कार्यान्वित आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १७ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ६२ कोटी ६२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूलपात्र आहे.
त्यापैकी २० मार्च अखेरपर्यंत २४ कोटी १६ लाख ४६ हजार रुपयांचा कर वसूल झाला आहे. एकूण कराच्या ३८.५९ टक्के वसुली झाली आहे. जिल्ह्यातील १७ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ४४ कोटी चार लाख ८१ हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल पात्र आहे. २० मार्चपर्यंत १२ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.