Maharashtra Assembly Elections 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : अहिल्यानगरला आचारसंहिता भंगाच्या ३९ तक्रारी दाखल

Code Of Conduct : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८ तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.

उर्वरित ११ तक्रारींपैकी २ तक्रारी इतर जिल्ह्यांच्या असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबरच ९ तक्रारी विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या. तक्रारींचा निपटारा करण्याची वेळ सरासरी ३१ मिनिट व ३९ सेकंदाची असल्याची माहिती आचार संहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे.

निकाली काढण्यात आलेल्या तक्रारींमध्ये अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाच्या १५, अकोले १, पारनेर १, शेवगाव १, कोपरगाव १, राहुरी २, शिर्डी ४ व श्रीरामपूर मतदारसंघातील ३ तक्रारींचा समावेश आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे १०० मिनिटांत चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

सर्वेक्षण पथकांची नियुक्ती

अहिल्यानगर आणि संगमनेर मतदार संघात प्रत्येकी ८ आणि इतर सर्व मतदार संघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ स्थिर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे मद्य आणि पैशाच्या अवैध वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

अहिल्यानगर मतदारसंघात ६, संगमनेर ५ आणि इतर सर्व मतदार संघात प्रत्येकी ३ याप्रमाणे ४१ व्हिडिओ सर्वेक्षण पथक राजकीय प्रचारावर लक्ष ठेवून आहे. या पथकाकडून खर्च समितीच्या संदर्भासाठी आवश्यक चित्रीकरण देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक मतदार संघात एक व्हिडिओ अवलोकन पथक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT