Hapus Mango  Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Mango : कोकणातून हापूसच्या ३८० पेट्या वाशी बाजारात

Hapus Mango Market : सोमवारची उलाढाल; चार, पाच डझनाला ६ ते ११ हजार रुपये दर

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Konkan Hapus : रत्नागिरी ः नवी मुंबईतील वाशी बाजार समितीमध्ये कोकणातील हापूस आंब्याची एंट्री झाली आहे. सोमवारी (ता. २९) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धन येथून सुमारे ३८० पेट्या दाखल झाल्या. तर मंगळवारी (ता. ३०) शंभर पेटी आल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक पेट्या देवगडमधील असून, त्यापाठोपाठ रत्नागिरी, दापोली, बाणकोटमधील पेट्या आहेत. चार व पाच डझनांच्या पेटीला ६ ते ११ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा सुरुवातीला हापूससाठी पोषक वातावरण होते. मात्र जानेवारी महिन्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लागलेल्या मोहरामधील उत्पादन कमी हाती येत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला रत्नागिरीमधून पहिली पेटी वाशी बाजारात रवाना झाली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून सोमवारी एकाच दिवशी ४० हून अधिक पेट्या पाठविण्यात आल्या आहेत. बाणकोट आणि श्रीवर्धनमधूनही आंबा पाठविला जात आहे. दापोली, संगमेश्‍वर, राजापूरमधून किरकोळ आंबा वाशीमध्ये रवाना होत आहे. सर्वाधिक देवगडमधून सुमारे २५० पेट्या आंबा सोमवारी बाजारात पोहोचला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून पेट्यांचे प्रमाण कमी असले, तरीही १५ फेब्रुवारीनंतर यामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा वाशीमधील व्यावसायिक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की सध्या कोकणातून किरकोळ हापूस येत आहे. त्याची विक्री सुरू आहे. दरही चांगला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण तुलनेत खूप कमी आहे. ३० जानेवारीच्या पूर्वी पंधरा दिवसांत सर्व मिळून दोनशे पेटी हापूस कोकणातून आला होता. या वर्षी तुलनेत लवकर हंगामाला सुरुवात झाली आहे.


सुरुवातीच्या टप्प्यातील मोहरामधून किरकोळ उत्पादन सध्या मिळत आहे. मधल्या कालावधीत दुबार मोहर आल्यामुळे सुरुवातीची कैरी गळून गेली. सध्या चार ते पाच पेट्या आंबा मिळतो. तो काढून वाशी बाजारात पाठविण्यात येत आहे. हा आंबा अजून पंधरा दिवस मिळेल. त्यानंतर पुन्हा मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात जाण्यास सुरुवात होतील.
- रूपेश शितप, आंबा बागायतदार, करबुडे, ता. रत्नागिरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Karjmafi : ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय; मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची बैठक संपली

Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा झोडपले

Crop Damage: हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर

Flower Market: फूल बाजारासाठी समितीत जागा द्या

Soil Health: अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य  

SCROLL FOR NEXT