Marathwada Water storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३८ टीएमसी उपयुक्त पाणी

Water Stock In Dam : मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांत बुधवार (ता. ३१) अखेरपर्यंत ६९.२ टीएमसी पाणीसाठा झाला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांत बुधवार (ता. ३१) अखेरपर्यंत ६९.२ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यापैकी ३८.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेत या सर्व प्रकल्पांमध्ये ७४.३८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता.

गतवर्षी ३१ जुलै अखेरपर्यंत मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात एकूण २१०६.५१ दलघमी व ७४.३३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये जायकवाडीतील २४.२२ टीएमसी, निम्न दुधनामधील २.३७ टीएमसी, येलदरीतील १७.८ टीएमसी, सिद्धेश्‍वरमधील १.१३ टीएमसी, माजलगाव मधील १.८१ टीएमसी, मांजरामधील १.६९ टीएमसी, पैनगंगामधील २०.९५ टीएमसी, मानारमधील २.२६ टीएमसी, निम्न तेरणामधील ०.९८ टीएमसी, विष्णुपुरीतील १.९० टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश होता.

त्या वेळी सीना कोळेगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नव्हता. गतवर्षी ४०.८६ टक्के असलेला उपयुक्त पाणीसाठा यंदा ३१ जुलै अखेर २०.९४ टक्केच झाला आहे. आताच्या घडीला अकराही मोठ्या प्रकल्पात ३८.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला.

त्यामध्ये जायकवाडीमधील ६.४ टीएमसी, निम्न दुधनामधील ०.७३, टीएमसी येलदरीतील ९.२ टीएमसी, सिद्धेश्‍वरमधील ०.८१ टीएमसी, मांजरामधील ०.१० टीएमसी, पैनगंगामधील १५.३५ टीएमसी, मानार मधील २.४७ टीएमसी, निम्न तेरणामधील ०.९२ टीएमसी, विष्णुपुरीतील २.६९ टीएमसी पाणीसाठ्याचा समावेश आहे.

आताच्या घडीला सीना कोळेगाव सह माजलगाव प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. सिद्धेश्‍वर, निम्न दुधना, निम्न तेरणा व मांजरा या प्रकल्पात मृतसाठ्याच्या किंचित वर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपल्यानंतरही पिकापुरता पडत असलेला पाऊस पाणीसाठ्यांबाबत कृपादृष्टी ठेवून नसल्याचीच स्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीसाठा यांची स्थिती चिंता वाढविणारी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT