Ground Water Level  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : भूजल संवर्धनासाठी ३६ गावांचा होणार गौरव

Team Agrowon

Pune News : राज्यातील ३६ ग्रामपंचायतींनी केंद्र पुरस्कृत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत बाजी मारली आहे. या ग्रामपंचायतींमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील ‍पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमधील बारा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींमध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या स्पर्धेत जिल्हानिहाय प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लाख, द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३० लाख आणि तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत. यामुळे या ३६ ग्रामपंचायतींना मिळून एकूण बारा कोटी रुपयांची रक्कम ही बक्षिसापोटी मिळणार आहे.

केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने सन २०२२-२३ या वर्षासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण आणि बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने ही २६ नोव्हेंबर २०२० पासून अटल भूजल योजना सुरु केली आहे.

राज्यातील १३ जिल्ह्यांमधील ४३ तालुक्यातील एक हजार १३३ ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. २०२२-२३ या वर्षीच्या या स्पर्धेत राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, नगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अमरावती व नागपूर या बारा जिल्ह्यांमधील २७० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता, असे अटल भूजल योजनेचे प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी सांगितले.

पहिल्या तीन पुरस्कारांच्या मानकरी ग्रामपंचायती (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)

पुणे - काऱ्हाटी, ता. बारामती, सोनोरी, ता. पुरंदर, चांबळी, ता. पुरंदर

सातारा - किरकसाल, ता. माण, निढळ, ता. खटाव, मांडवे, ता. खटाव

सांगली- नांगोळे, ता. कवठेमहांकाळ, बोरगाव, ता. कवठेमहांकाळ, वडगाव, ता. तासगाव

सोलापूर- भेंड, लोंढेवाडी, सोलंकरवाडी, सर्व ता. माढा

नाशिक - वडगाव पिंगळा, दातली, दोन्ही ता. सिन्नर, कनकापूर, ता. देवळा

जळगाव - सावखेडे बुद्रुक, ता. रावेर, उंदिरखेडे, ता. पारोळा, खिरोदा प्र. यावल, ता. रावेर

जालना - आंबा, ता. परतूर, बोररांजणी, हातडी, दोन्ही ता. घनसावंगी

लातूर - हरंगळ बुद्रुक, ता. लातूर, जाजनूर, ता. निलंगा, वडवळ ना. ता. चाकूर

धाराशिव - खेड, खामसवाडी, दोन्ही ता. धाराशिव, भगतवाडी, ता. उमरगा

अमरावती - जरुड, झटामझरी, दोन्ही ता. वरुड, अंबाडा, ता. मोर्शी

बुलडाणा - निपाणा, शेलगाव बाजार, वरुड, सर्व ता. बुलडाणा

नागपूर - खेडी गोवारगोंदी, ता. नरखेड, खुर्सापार, डोर्ली भांडवरकर, दोन्ही ता. काटोल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT