Water Conservation
Water ConservationAgrowon

Ground Water : अतिखोल भूजलस्रोतांचे पुनर्भरण आवश्यक

Ground Water : कमी पर्जन्यमानामुळे सध्या भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी कमी होऊ लागली आहे.
Published on

Pune News : ‘‘कमी प्यमानामुळे सध्या भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी कमी होऊ लागली आहे. ती वाढविण्यासाठी जमिनीतील अतिखोल भूजलस्रोतांचे पुनर्भरण होणे आवश्यक आहे,’’ असे मत भूजल सर्वेक्षण विभागाचे संतोष गावडे यांनी व्यक्त केले.

‘जल जीवन मिशन’अंतर्गत भूजल स्रोत बळकटीकरण संदर्भात भूजल सर्वेक्षण विभागाचे संतोष गावडे व संजय बनकर यांनी वाल्हे परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी केली.

Water Conservation
Water Conservation : राजस्थानातील आलमपूरमध्ये कौटुंबिक संपन्नता

या प्रसंगी सरपंच अमोल गायकवाड, दादासाहेब मदने, हरीश दुबळे, सचिन भोसले, सोमनाथ गायकवाड, भाऊसो भुजबळ, प्रीतम भोसले आदी उपस्थित होते.

Water Conservation
Water Conservation Award : ‘मिशन ५००’चे पाच पाटील, शेखर निंबाळकर यांना ‘जल प्रहरी सन्मान’

‘‘कमी पर्जन्यमानामुळे परिसरातील जलस्रोत कोरडे पडले आहेत. पाण्याचा उपसा वाढल्याने भूजल पातळी खोलवर गेली आहे.

ती वाढविण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत दोन दिवसांत परिसरातील कोरड्या पडलेल्या जलाशयांमध्ये मशिनच्या साह्याने छिद्रे घेऊन खालावलेली भूजल पातळी पूर्ववत करण्याची कामे हाती घेण्यात येतील,’’ असे बनकर यांनी सांगितले. सरपंच अतुल गायकवाड यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com