Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Trader Fraud : कांदा व्यापाऱ्याची ३६ लाखांची फसवणूक

Fraud Update : मध्य प्रदेशातील इंदोर येथील व्यापाऱ्याने नेप्ती उपबाजारातील कांदा व्यापाऱ्याची ३६ लाख ३५ हजार १२२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Team Agrowon

Nagar News : मध्य प्रदेशातील इंदोर येथील व्यापाऱ्याने नेप्ती उपबाजारातील कांदा व्यापाऱ्याची ३६ लाख ३५ हजार १२२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदोरच्या व्यापाऱ्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदा व्यापारी राहुल रामदास आंधळे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आंधळे हे नेप्ती उपबाजार येथील जयश्री ट्रेडिंग कंपनी या फर्ममध्ये भागीदार आहेत. या फर्म मार्फत ते शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये विक्रीस आणलेला कांदा खरेदी करून तो परराज्यातील मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात.

मध्यप्रदेशातील इंदोर येथील व्यापारी शाबीर शब्बीर खान याने गेल्या काही दिवसांपासून आंधळे यांच्याशी व्यवहार करीत त्यांच्याकडून खरेदी केलेल्या कांद्याचे वेळेवर पैसे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर १२ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्याने आंधळे यांच्याकडून सुमारे ३६ लाख ३५ हजार १२२ रुपये किमतीचा कांदा खरेदी केला.

या पूर्वीचे व्यवहार चांगले असल्याने आंधळे यांनीही त्याच्यावर विश्वास दाखवून कांदा पाठवला. मात्र, त्यानंतर शाबीर खान याने हे पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. अनेकदा संपर्क करूनही त्याने पैसे न पाठविल्याने आंधळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शाबीर खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?

Crop Damage : घेवडा करपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी

Surya Ghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ७४ हजार ग्राहक वीज निर्माते

Nashik APMC : पांजरापोळ प्रकरणात नाशिक बाजार समितीला दणका

SCROLL FOR NEXT