Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Onion Rate : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून ५ लाख टन कांद्याचा बफर साठा करण्यासाठी खरेदी होणार आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून ५ लाख टन कांद्याचा बफर साठा करण्यासाठी खरेदी होणार आहे. प्रत्यक्षात मार्चअखेर रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे.

मात्र अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादकांना तोटा झाला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एनसीसीएफ’कडून नाशिक जिल्ह्यात ७ मेपासून कांदा खरेदी सुरू होणार आहे का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

रब्बी कांदा खरेदी हंगाम-२०२४ च्या अनुषंगाने राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाचे (एनसीसीएफ) अध्यक्ष विशाल सिंग हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या वेळी शाखा व्यवस्थापक परीक्षित एम., जितीन ग्रोव्हर, सागर शर्मा आदी उपस्थित होते.

Onion Market
Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

सिंग यांनी या वेळी कांदा खरेदीबाबत विस्तृत माहिती दिली. कांदा खरेदीमध्ये सुधारणा करून पारदर्शकता आणण्यासाठी काम सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी नव्याने ५० खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. यासह खरेदीपश्‍चात ७२ तासांत शेतकऱ्यांसाठी पेमेंट यंत्रणा थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Onion Market
Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून खरेदी प्रामुख्याने नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यांत होईल. मात्र ही खरेदी केंद्रे अद्याप जाहीर झालेली नाहीत. त्याची माहिती लवकरच ट्विटरच्या माध्यमातून देण्यात येईल, असेही सिंग यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

मोदींच्या सभेमुळे कांद्याची खरेदी सुरू केली का?

‘‘गेल्या दोन महिन्यांत केंद्र सुरू न झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागला. जर लवकर खरेदी सुरू केली असती तर आम्हाला फटका बसला नसता’’ असा सवाल उपस्थित कांदा उत्पादकांनी केला. यावर ‘‘केंद्रीय मंत्र्यांना सांगून पुढील वर्षी वेळेवर खरेदी सुरू करू’’ असा विश्‍वास सिंग यांनी दिला. ‘‘इतके दिवस खरेदी बंद होती. आता नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची प्रचार सभा होणार आहे. त्यामुळेही खरेदी सुरू केली का?’’ असाही सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com