Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नैसर्गिक आपत्तीचा ३५ हजार शेतकऱ्यांना फटका

Kharif Season : खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याचा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Team Agrowon

Gondiya News : खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याचा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

२०२२-२३ या वर्षात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात होता. त्यानुसार वेळेवर पावसाने हजेरी लावली. मात्र खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला.

खरीप हंगामादरम्यान अतिवृष्टी, पूरस्थिती आणि वादळी वाऱ्याने गोंदिया जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर रब्बी हंगामातही संततधार अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांना जेरीस आणले.

तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे यात नुकसान झाले. खरीप व रब्बी हंगामात १४,७५५ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले.

भरपाईपोटी शासनाकडून ३० लाख ५९ हजार २६४ रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. रब्बी हंगामापासून शेतकऱ्यांना मोठी आशा होती, मात्र या कालावधीत अवकाळी पावसाने ४५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे १५० हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

एप्रिल महिन्यात ३२२ शेतकऱ्यांचे १२३ हेक्‍टर, तर मे महिन्यात ३२१ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

खरीप हंगामात सर्वाधिक नुकसान

जून ते ऑक्‍टोबर २०२२ या कालावधीत खरीप हंगाम राहतो. परंतु गेल्या खरिपात पावसाची संततधार होती. त्यामुळे १२८२९.८९ हेक्‍टर क्षेत्रातील पिके बाधित झाली.

याचा फटका २१ हजार शेतकऱ्यांना बसला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने ३३०० शेतकऱ्यांचे १३५० हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT