Cotton Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात ३५ कोटी रुपये जमा

Team Agrowon

Chandrapur News : राज्य शासनाने खरीप हंगाम २०२३-२४ मधील कापूस व सोयाबीन पिकाच्या लागवडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत जाहीर केली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक ६६ हजार ८६० शेतकऱ्यांच्या खात्यात ३५ कोटी २० लाख ९६ हजार १९१ रुपये जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात एकूण पेरणी खालील सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ५८ हजार ८५७ हेक्टर असून यामध्ये सोयाबीन पिकाखाली क्षेत्र ७३ हजार ३९ हेक्टर, तर कापूस पिकाखाली क्षेत्र १ लाख ६९ हजार ९३६ हेक्टर आहे. सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके मिळून जिल्ह्यात एकूण २ लाख ४२ हजार ९७५ हेक्टर क्षेत्र म्हणजेच एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या ५२.९५ टक्के क्षेत्र या दोन पिकाखाली आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार २८७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात २२ कोटी ८ लाख ६४ हजार ८८६ रुपये, तर २५ हजार ५७३ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात १३ कोटी १२ लाख ३१ हजार ३०५ रुपये असे दोन्ही पिके मिळून जिल्ह्यातील ६६ हजार ८६० शेतकऱ्यांच्या खात्यात ३५ कोटी २० लाख ९६ हजार १९१ रुपये जमा करण्यात आले आहेत. वरील मदतीसाठी लाभार्थी निवड करत असताना पात्र लाभार्थी खातेदारांच्या याद्या ग्रामपंचायत आणि गावात ठळक ठिकाणी लावण्यात आल्या होत्या.

अनेक खातेदार बाहेरगावी

गावात राहणाऱ्या बहुतांशी पात्र शेतकऱ्यांकडून त्यांचे आधार संमती पत्रे घेण्यात आली व त्यानुसार त्यांना वरीलप्रमाणे मदत देण्यात आली. यात अनेक खातेदार बाहेरगावी इतर व्यवसायानिमित्त असल्याने त्यांचे आधार संमती मिळण्यास अडचणी आहेत. परंतु पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्याकडून ऑनलाइन आधार संमती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT