Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

Agriculture Subsidy : ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अर्थसाह्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करुन घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Cotton and Soybean
Cotton and SoybeanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : राज्य शासनाने २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेल्या अर्थसाह्य योजनेत ई-केवायसी पूर्ण केलेले परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना १६३ कोटी ६० लाख २१ हजार १३० आणि हिंगोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना १०२ कोटी २५ लाख ४८ हजार ४०१ रुपये मिळून एकूण २६५ कोटी ८५ लाख ६९ हजार ५३१ रुपये एवढे अनुदान देय आहे.

ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अर्थसाह्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करुन घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Cotton and Soybean
Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २,३९८ कोटींचे अनुदान

गतवर्षी (२०२३) बाजारभाव कमी झाल्यामुळे कापूस व उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.त्याबद्दल राज्यशासनाकडून खरिपातील ई-पीकपाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कपाशी आणि सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रानुसार परिगणना करुन अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. २० गुंठे पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये तर २० गुंठेपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अर्थसाहाय्य २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यात कापूस व सोयाबीन मिळून एकूण ५ लाख ६६ लाख ५२७ शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थसहाय्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील अर्थसाहाय्य वितरित करण्यास पात्र शेतकऱ्यांमध्ये कापूस उत्पादक ९६ हजार ८८८ आणि सोयाबीन उत्पादक ३ लाख ४० हजार १०८ मिळून एकूण ४ लाख ३६ हजार ९९६ शेतकरी आहेत.

Cotton and Soybean
Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

कापसाची ३१ कोटी २ लाख २७५ रुपये आणि सोयाबीनचे १३२ कोटी ५७ लाख २५ हजार ८५५ रुपये मिळून एकूण १६३ कोटी ६० लाख २१ हजार १३० रुपये एवढे अर्थसाहाय्य देय आहे. हिंगोली जिल्ह्यात कापूस उत्पादक ३७ हजार ९६ आणि सोयाबीन उत्पादक ३ लाख ६६ हजार ४६० मिळून एकूण ४ लाख ३ हजार ५५६ शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याचे उद्दिष्ट आहे.

ई-केवायसी पूर्ण केलेल्यांपैकी अर्थसाहाय्य वितरणास पात्र शेतकऱ्यांमध्ये कापूस उत्पादक २५ हजार ५५९ आणि सोयाबीन उत्पादक २ लाख ५६ हजार १०५ मिळून एकूण २ लाख ८१ हजार ६६४ शेतकरी आहेत. कापसाची ६ कोटी ५५ लाख ९७ हजार ६२२ रुपये आणि सोयाबीनची ९५ कोटी ६९ लाख ५० हजार ७७९ रुपये मिळून एकूण १०२ कोटी २५ लाख ४८ हजार ४०१ रुपये एवढे अर्थसाहाय्य देय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com