Dr. Pravin Ranvare Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Scarcity Management : चाऱ्यासाठी साडेतीन कोटींचे बियाणे वाटप

Distribution of Seeds : दुष्काळी स्थितीत जिल्ह्यातील दुधाळ जनावरांना जगवण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये किमतीचे चारा बियाणे उपलब्ध केले गेले आहे.

Team Agrowon

Solapur News : दुष्काळी स्थितीत जिल्ह्यातील दुधाळ जनावरांना जगवण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये किमतीचे चारा बियाणे उपलब्ध केले गेले आहे. निदान जून अखेरीपर्यंत जनावरे चाऱ्यापर्यंत वंचित राहणार नाहीत, यासाठी सूक्ष्मनियोजन करण्याचा प्रयत्न झाला आहे.

यावर्षी दुष्काळी स्थिती आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. पण या कालावधीत दुधाळ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या स्थितीत पशुपालक जनावरे विकण्याचा पर्याय काढतात.

ज्यामुळे पशुपालकांना दूध उत्पादनांचा देखील फटका बसतो. ही स्थिती टाळण्यासाठी जनावरांना पुरेशा चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन केले गेले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेत कृषी, पशुसंवर्धन खात्याशी समन्वय साधून मदतीचा आराखडा मांडला.

प्रशासनाने प्रत्येक गावातील दुधाळ जनावरांची संख्या काढून त्यांची चाऱ्याची गरज निश्चित केली आहे. तसेच सध्या उपलब्ध असलेला चारा किती कालावधीपर्यंत उपलब्ध होईल, याचा अंदाज घेतला गेला.

त्यानुसार ज्या गावातील चारा आधी संपेल त्यापूर्वीच त्या गावातील शेतकऱ्यांकडून चारा पिकाचे उत्पादन हाती येईल, या पद्धतीने नियोजन करत चारा पीक बियाणांचे वाटप होत आहे. पहिल्याच टप्प्यात साडेतीन कोटीचे बियाणे वाटप करून पुढील दोन महिन्यातील चारा टंचाईचा प्रश्न सोडवला जाणार आहे.

नियोजनासोबत वैरणीचा मका, न्यूट्रीफीडची बियाणे वाटप झाले आहे. येत्या दोनच महिन्यात जिल्ह्यातील निवडक गावात चाराटंचाईचा अंदाज घेऊन बियाणे वाटप केले गेले आहे. त्यासाठी जिल्हा योजनेतून निधी देखील तातडीने देण्यात आला.

चारा वाहतूक बंदी

जिल्हा प्रशासनाने चारा वाहतूक बंदी घातली आहे. त्या आदेशानुसार जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास पायबंद करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक जनावरांना चारा पुरण्यासाठी या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

आकडे बोलतात

जिल्ह्याचे पशुधन : १२ लाख

रोज लागणारा चारा : २५ हजार मेट्रिक टन

जनावरांना चारा पुरवण्यासाठी नियोजित दिवस : १०२

चारा पीक बियाणे वाटप : १ लाख ३२ हजार ९३४

दुष्काळी परिस्थितीत पुढील काळात

उपलब्ध होणारा चारा : २५ लाख मेट्रिक टन

चारा पिकांचे लागवड क्षेत्र : ७५०० हेक्टर

चारा पीक हाती येण्याचा कालावधी : ६० दिवस

जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार चारा बियाणेवाटप केले गेले आहे. कोणत्याही गावात चाराटंचाई भासणार नाही याची काळजी या सूक्ष्म नियोजनात घेतली गेली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.
डॉ. प्रदीप रणवरे, पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक), पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT