Pune News : अकोल्यात देखील जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी चारा वाहतूक मनाई आदेश काढला आहे. यामुळे जिल्ह्यातील पशूपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चाऱ्याचा प्रश्न
राज्यात यंदा सरसरीपेक्षी कमी पाऊस झाला. याचा थेट फटका राज्यातील ४० तालुक्यांना बसला आहे. येथील १०२१ महसुली मंडळासह नव्या २२४ महसुली मंडळांत दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली आहे. यात अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. येथे देखील दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाहतूक करण्यास मनाई
या आदेशाप्रमाणे जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर हा मनाई आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू असेल.
चाऱ्याचे भाव गगनाला भिडले
राज्यातील दुष्काळसदृश स्थितीमुळे चाराटंचाई होत आहे. यामुळे चारा विकत घेण्यासाठी पशुपालकांना पळापळ करावी लागत आहे. त्यातच चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे चाऱ्याची पळवापळवी पाहायला मिळत आहे. तर शहरातील पशुपालकांकडून सोयाबीन व तुरीचे कुटार-चारा जास्त किंमतीला खरेदी केला जात आहे. याचा परिणाम ग्रामीण भागात चारा मिळत नसल्याचे चित्र आहे. तर जो आहे त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
फेब्रुवारीच्या मध्यातच चाराटंचाई
जानेवारी महिन्यातच राज्यातील अनेक भागात दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली आहे. तर आता फेब्रुवारीच्या मध्यातच चाराटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन आणि तूर या पिकांचा चारा पेरा कमी झाला आहे. याचा थेट परिणाम हा चाऱ्यावर झाला आहे. त्यातच चारा दूरवरून आणावा लागत असल्याने पशुपालकांना जनावरांना काय घालावं असा प्रश्न सतावत आहे. त्यावरून चारानिर्मितासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाची मदत घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
परभणीत देखील मनाई आदेश
फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच परभणी जिल्ह्यात चाराटंचाईवरून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी चाऱ्यावरून आदेश काढले होते. तसेच जिल्ह्यात उत्पादित होणारा विविध प्रकाराचा चारा, मुरघास वाहतूक करण्यास बंदी घातली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.