Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीची ३२ टक्के पेरणी पूर्ण

Rabi Season : जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे. गहू, हरभरा पेरणी सुरू आहे. कमी पावसाचा परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे. गहू, हरभरा पेरणी सुरू आहे.आतापर्यंत सर्वाधिक पारनेर तालुक्यात पेरणी झाली आहे. कमी पावसाचा परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर झाला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. दरवर्षी परतीचा पाऊस जोरात होत असल्याने रब्बीच्या पेरण्यांना उशीर होत असतो. मात्र यंदा रब्बी पेरण्या वेळेत सुरू झाल्या असल्या, तरी पाऊस नसल्याचा अनेक भागात पेरण्यांवर परिणाम होत आहे.

आतापर्यंत ज्वारीची सरासरीच्या ४७ टक्के, गव्हाची चार टक्के, हरभऱ्याची १७ टक्के, मक्याची ५० टक्के पेरणी झाली आहे. करडईचे क्षेत्र मुळातच बोटावर मोजण्या एवढे असते. त्यात यंदा आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरणी झाली आहे. पारनेर, नगर, कर्जत, पाथर्डी, राहाता, जामखेड तालुक्यांत सर्वाधिक पेरणी झाली आहे.

अकोले, कोपरगाव, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यांत पेरणीचा वेग फारच कमी आहे. यंदा रब्बी पेरण्यांना उशीर होत आहे. पाऊस नसल्याचाही परिणाम पेरण्यांवर दिसत आहे. यंदा कोरडवाहू भागांत ज्वारीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर) व कंसात सरासरी क्षेत्र

ज्वारी १,२३,६१९ (३,७६,८३४)

गहू ३,०५० (८६,४०४)

मका ६,९८६ (१४,१८४)

हरभरा १४,९७३ (८८,३७६)

करडई ४६ (३६०)

जवस १८ (१५)

तीळ २५ (२०)

सूर्यफूल २ (३१)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT