Farmer Incentive Agrowon
ॲग्रो विशेष

Incentive Subsidy : प्रोत्साहनपर अनुदानासाठी ३१ हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

Farmer Scheme : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत मंगळवार (ता. ३०) अखेर परभणी जिल्ह्यातील १० हजार ४६७ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३२ कोटी ७६ लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली.

Team Agrowon

Parbhani News : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत मंगळवार (ता. ३०) अखेर परभणी जिल्ह्यातील १० हजार ४६७ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३२ कोटी ७६ लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली. या अंतर्गत अद्याप ३१ हजारांवर शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यत दिला जात आहे.

या तीन वर्षांपकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जात आहे.या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ५१२ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

आजवर विशिष्ट क्रमांकासह ११ हजार ३३५ शेतकऱ्यांची प्रसिद्ध झाली. त्यापैकी १० हजार ९७० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतले तर ३६३ खात्याचे आधार प्रमाणिकरण अजून बाकी आहे.एकूण १६५ कर्ज खात्याबाबत तक्रारी आहेत.

जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती मार्फत १०६ तक्रारीचे निराकरण करण्यात आले अजून १२ तक्रारी प्रलंबित होत्या.तालुकास्तरावर प्राप्त ४१ पैकी ६ तक्रारी प्रलंबित आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. मंगळवार (ता. ३०) अखेर जिल्ह्यातील १० हजार ४६७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३२ कोटी ७६ लाख रुपयाचे अनुदान जमा झाले आहे.

या अंतर्गत अनुदानास पात्र शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया रखडत सुरु आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT